सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!
सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती! या खेळाडूने आपल्या अद्भुत फलंदाजीने जगातील प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळा अधिराज्य गाजवले.अनेकांना त्याच्या खेळातून प्रेरणा मिळाली.अनेक खेळाडू जे नंतरच्या काळात चांगले नावलौकिक मिळवते झाले त्यापैकी बरेच जण सचिनलाच आपला आदर्श मानतात.ज्याला बघत प्रेरणा घेत जे खेळाडू मोठे झाले व त्याच्यासोबतच खेळण्याचे भाग्य काहींना लाभले.अनेक मध्यमवर्गीय पालकांवर सुद्धा सचिनने मोहिनी घातली.किंबहुना मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षांचे सचिन तेंडूलकर हा प्रतिकच बनला होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबांतून येऊन जगाच्या व्यासपीठावर आपले नाणे खणखणीत वाजवणारा...नव्हे तर आपल्या तालावर नाचायला लावणारा... मला सुद्धा शालेय जीवनात सचिन जीवनापासूनच आवडायला लागला.खरेतर मला आणि माझ्यासारख्या असंख्य मुलांना अभ्यासावरुन लक्ष हटविण्यात सचिनचा खूप मोठा हात होता.आणि माझ्या या मताशी तर अनेक पालक सहमत असतील.क्रिकेटशी माझी नाळ विशेषतः सचिनच्या फलंदाजीशी जोडली गेली होती.मी सातवीत असताना वेस्टइंडीज १९९४ च्या भारत दौर्यावर आली असताना नागपूर कसोटीत सचिन फलंदाजी...