Posts

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी

Image
२४ फेब्रुवारी २०१९ च्या ५३ व्या मन की बात मध्ये मोदीजी म्हणाले होते आता भेटूया मे २०१९ च्या मन की बात मध्ये... आणि आज ते म्हणाले माझ्या तिसऱ्या टर्म मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल...काय आत्मविश्वास आहे! हा आत्मविश्वास आहे स्वतःच्या कामाचा...देशामध्ये घडत असलेल्या सकारात्मक बदलांचा...हा आत्मविश्वास राष्ट्रहिताच्या निर्णयांचा....हा आत्मविश्वास आहे जनतेच्या प्रचंड प्रेमाचा...पाठिंब्याचा.... विश्वासाचा... कमाल आहे या माणसाची निवडणुकीचे राजकारण आमूलाग्र बदलविणारा हा नेता एकमेवाद्वितीय आहे...जनतेची नस अचूक पकडणारा असा नेता देशाला भेटला हे आपले परमभाग्यच! नाव बदलून जनतेला फसविण्यासाठी पुन्हा सज्ज होण्याचा आव आणणाऱ्या विरोधकांना तर हा आत्मविश्वास बघून गाठोडे बांधायची तयारी करावी लागेल असे दिसतेय... निवडणुकांना सामोरे जाताना लोकप्रिय घोषणा करून पुन्हा निवडणूक जिंकायची आणि पुन्हा पुढील निवडणुकी पर्यंत जनतेला आशेला लावायचे या काँग्रेसी प्रकाराला हद्दपार करून शोषित पिडीत वंचित मजूर शेतकरी महिला युवा यांच्याप्रति आपले सरकार समर

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"

Image
*घराणेशाही वाचविण्याची धडपड* पाटणा येथील भाजप विरोधातील पक्षाच्या बैठकीने २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.पंतप्रधान मोदीजी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्याचा मुहुर्त या बैठकीसाठी काढण्यात आला... आधी १२ जून तारीख ठरली होती पण ती पुढे ढकलली..राहुल गांधी भारतात नसल्याचे सांगण्यात आले पण खरे कारण १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद हायकोर्टाचा आलेला तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यविरोधातील निकाल या कटु आठवणीच्या दिवशी नको म्हणून तारीख बदलण्यात आली ही खरी गोम आहे. ...नाही म्हणता भारतीय माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात हे पक्ष यशस्वी ठरले असे म्हणता येईल. १५ पक्षांचे २७ नेते सहभागी झालेल्या या भाजप विरोधी पक्षाच्या बैठकीचे यजमानपद,पुढाकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतला होता..आणि या बैठकीत काय झाले हे सर्व आपल्यासमोर आले आहेच... एकमेकांची उणीदुणी काढून, एकमेकांवर तोंडसुख घेवून एकत्र नांदायचे यावर एकमत होवून आता पुढील बैठकीत महाठगबंधन चे संयोजक व पुढील रणनीती आखली जाणार असल्याचे सांगितले गेले...पण खरी गंमत तिथेच येणार कारण या बैठकीचे यजमान काँगेस पक्ष असण

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

Image
अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत भूतकाळ- वर्तमानकाळ -भविष्यकाळ उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।। - विष्णु पुराण यानि समुद्र के उत्तर और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत, तथा उनकी संतानों को भारती कहते हैं। *आपली चूक* भारताच्या इतिहास आणि वर्तमानाबद्दल चर्चा करताना आपण बहुतांश वेळा उत्तर भारत,पूर्व भारतातील बंगाल,मध्य भारत,पंजाब  यांचाच विचार करतो...यातून चुकून आठवलेच तर दक्षिण भारताकडे आपले लक्ष जाते.. दुर्दैवाने आपण या आपल्याच देशाचा अविभाज्य घटक असलेल्या भागाकडे दुर्लक्ष करतो... याच गोष्टींपासून बोध घेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सहकार्यवाह यांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांनी साधना केलेल्या खडकावर स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यासाठी ३०० खासदारांचा पाठिंबा मिळवला.आणि याला लोकचळवळ बनवत एक एक रुपया जमवून हे स्मारक उभे केले.या प्रयत्नांचा उल्लेख करणे महत्वाचे आहे. आपली राष्ट्रीय माध्यमे (National Media) सुद्धा फक्त हिंदी भाषिक रा