Posts

Showing posts from July, 2017

माझे वडिल-माझे प्रेरणास्रोत

Image
"माझे वडिल...माझे प्रेरणास्रोत!" "रविंद्र बाळासाहेब माने" असे पूर्ण नाव लिहिल्याशिवाय मनाला समाधानच वाटत नाही.लहानपणापासूनच असे संपूर्ण नाव लिहिण्याची सवय आहे.अगदी इंटरनेटच्या जंजाळात वेगवेगळे अकाऊंट ओपन करण्यासाठी अनिवार्य नसतानाही संपूर्ण नावच टाकले आहे.कारण असे संपूर्ण नाव लिहिल्याशिवाय माझ्या नावाला पूर्णत्वच प्राप्त होत नाही.किंबहुना वडिलांच्या नावाशिवाय माझे नाव अशी कल्पनाच करवत नाही.त्यांचे नाव जोडले गेल्यामुळेच कुठे जीवनाला अर्थ प्राप्त झालाय! "वडिल" म्हणजे काय आपणा सर्वांना काय सांगावे? आज आषाढ शुद्ध दशमी (३ जुलै) माझे वडिल वैकुंठवासी बाळासाहेब तुकाराम माने यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन! बघता बघता दोन वर्षे झाली वडिल जाऊन! ज्यादिवशी वडिलांची आठवण येऊन डोळे पाणावले नाहीत...असा एकही दिवस गेला नाही.वेगवेगळे प्रसंग,कार्यक्रम किंवा सहज कुणाकडील सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येक वेळी त्यांची आठवण हि निघतेच.त्यामुळे ते आम्हाला सोडून गेले आहेत असे वाटतच नाही...आत्ताच येतील..नंतर येतील असे वाटत राहते... आमचे वडिल म्हणजे माझ्यासाठी माझा आदर्शच! निर्व्यस