Posts

Showing posts from December, 2019

*देशभक्तोंका अपमान ...नही सहेगा हिंदुस्थान!*

Image
*देशभक्तोंका अपमान ...नही सहेगा हिंदुस्थान!* *देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे मग ते कोणतीही विचारधारेचा अवलंब करणारे असोत...एक देशभक्त नागरिक म्हणून माझ्या मनात त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे.* *मग ते समाजवादाचे (सोशलीझम) अनुयायी शहीद सरदार भगतसिंह असोत किंवा साम्यवादाचे (कम्युनिझम) चे समर्थक नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा काँग्रेस विचार मानणारे लोकमान्य टिळक-महात्मा गांधी किंवा प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वजण सर्व देशभक्तांसाठी एकसमान या भारतमातेचे सुपुत्र आहेत हाच भाव मनामध्ये ठाम आहे.* *या राष्ट्रभक्तांचे विचार मार्ग वेगवेगळे होते पण त्यांचे ध्येय मात्र एकच होते..भारतमातेला पारतंत्र्यातून स्वतंत्र करणे ...मग त्यांच्यामध्ये भेदभाव का?* *आपल्या क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी या महान व्यक्तीमत्वांचा अपमान करणे राजकिय पक्षांनी सोडायला हवे.या महान व्यक्तीमत्वांचा त्याग वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील...हे लिहीत असताना असह्य मरणयातना भोगणार्या स्वा.सावरकरांचा चेहरा आठवून डोळ्यांत पाणी आले आहे...क्रां.बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आलेली