*देशभक्तोंका अपमान ...नही सहेगा हिंदुस्थान!*

*देशभक्तोंका अपमान ...नही सहेगा हिंदुस्थान!*

*देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे मग ते कोणतीही विचारधारेचा अवलंब करणारे असोत...एक देशभक्त नागरिक म्हणून माझ्या मनात त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे.*
*मग ते समाजवादाचे (सोशलीझम) अनुयायी शहीद सरदार भगतसिंह असोत किंवा साम्यवादाचे (कम्युनिझम) चे समर्थक नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा काँग्रेस विचार मानणारे लोकमान्य टिळक-महात्मा गांधी किंवा प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वजण सर्व देशभक्तांसाठी एकसमान या भारतमातेचे सुपुत्र आहेत हाच भाव मनामध्ये ठाम आहे.*
*या राष्ट्रभक्तांचे विचार मार्ग वेगवेगळे होते पण त्यांचे ध्येय मात्र एकच होते..भारतमातेला पारतंत्र्यातून स्वतंत्र करणे ...मग त्यांच्यामध्ये भेदभाव का?*
*आपल्या क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी या महान व्यक्तीमत्वांचा अपमान करणे राजकिय पक्षांनी सोडायला हवे.या महान व्यक्तीमत्वांचा त्याग वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील...हे लिहीत असताना असह्य मरणयातना भोगणार्या स्वा.सावरकरांचा चेहरा आठवून डोळ्यांत पाणी आले आहे...क्रां.बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आलेली उपेक्षा पाहिली तर मन सुन्न होते...अशा अनेक क्रांतिकारक-देशभक्तांच्या नशिबी उपेक्षाचआली आहे...त्यांच्या कार्याचा गौरव तर दूरच पण त्यांनासुद्धा जातीच्या संकुचित बेड्यांंमध्ये अडकवून इतिहासाने ...समाजाने मोठा अन्याय केला आहे..या महान क्रांतिकारकांमुळे आपण स्वातंत्र्य उपभोगतो आहोत..आपल्या सर्वांचे देश या मुद्द्यावर सर्वांचे एकमत हवे...आपापले राजकिय स्वार्थ-विचार-जोडे बाजूला ठेवून या स्वातंत्र्यवीरांना त्यांचा योग्य सन्मान (ज्याचे ते हक्कदार आहेत) मिळायलाच हवा यासाठी प्रयत्न करुयात!*

*रविंद्र बाळासाहेब माने*

*!!वंदे मातरम!!*
*!!भारत माता कि जय!!*





Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

पंजाबची दुखरी नस