अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी

२४ फेब्रुवारी २०१९ च्या ५३ व्या मन की बात मध्ये मोदीजी म्हणाले होते आता भेटूया मे २०१९ च्या मन की बात मध्ये... आणि आज ते म्हणाले माझ्या तिसऱ्या टर्म मध्ये भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल...काय आत्मविश्वास आहे!
हा आत्मविश्वास आहे स्वतःच्या कामाचा...देशामध्ये घडत असलेल्या सकारात्मक बदलांचा...हा आत्मविश्वास राष्ट्रहिताच्या निर्णयांचा....हा आत्मविश्वास आहे जनतेच्या प्रचंड प्रेमाचा...पाठिंब्याचा.... विश्वासाचा...

कमाल आहे या माणसाची निवडणुकीचे राजकारण आमूलाग्र बदलविणारा हा नेता एकमेवाद्वितीय आहे...जनतेची नस अचूक पकडणारा असा नेता देशाला भेटला हे आपले परमभाग्यच!
नाव बदलून जनतेला फसविण्यासाठी पुन्हा सज्ज होण्याचा आव आणणाऱ्या विरोधकांना तर हा आत्मविश्वास बघून गाठोडे बांधायची तयारी करावी लागेल असे दिसतेय...
निवडणुकांना सामोरे जाताना लोकप्रिय घोषणा करून पुन्हा निवडणूक जिंकायची आणि पुन्हा पुढील निवडणुकी पर्यंत जनतेला आशेला लावायचे या काँग्रेसी प्रकाराला हद्दपार करून शोषित पिडीत वंचित मजूर शेतकरी महिला युवा यांच्याप्रति आपले सरकार समर्पित असल्याचे सांगणारे मोदी आणि निवडणुक जिंकल्यानंतर लगेचच प्रत्यक्ष कामाला लागून जनतेला सरकारच्या योजना, धोरणांचा लाभ मिळवून देणारे नरेंद्रजी मोदी जनतेला अधिक विश्वासार्ह वाटतात...हा विश्वास फक्त घोषणेतून नाही तर प्रत्यक्ष कृतीतून मिळविला आहे...

मुळातच २०१४ ची निवडणुक ही व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी,कालबाह्य,भय,भूक, भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था निर्मितीसाठी आणि काल विसंगत ठरत चाललेल्या व्यवस्था बदलण्यासाठी आणि या देशाची जाणीवपूर्वक विस्मृतीत घालविली गेलेली वैभवशाली सांस्कृतिक ओळख, अभिमानास्पद इतिहास पुन्हा मिळवून देण्यासाठी जनतेने हातात घेतली होती...आणि तो विश्वास मोदींनी जनतेला दिला होता...हाच विश्वास सार्थ करण्यासाठी गेल्या ९ वर्षांपासून मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार अहोरात्र परिश्रम करत आहेत...७० वर्षांचा नाही तर १००० वर्षांचा कचरा साफ करण्यासाठी वेळ तर लागणारच ...तो वेळ त्यांनी घेतलाय ...त्याचे सकारात्मक परिणाम सुद्धा आपण सर्व क्षेत्रात पाहतो आहोत...कडी निंदा ते घुस के मारेंगे हा बदल....श्रीराम मंदिर निर्माण...३७० कलम हटवून देशाचे अखंडत्व टिकविले...अनेक सुधारणा...जगामध्ये भारताचा वाढलेला सन्मान...भारताची अर्थव्यवस्था... संरक्षण सिद्धता ... कोरोना संकटाला सामोरे जाताना भारताची उजळलेली प्रतिमा...हे जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळेच होवू शकले आहे...हा पाठिंबा मोदींच्या करिष्माई, चारित्र्यसंपन्न,कणखर नेतृत्वामुळे मिळाला आहे...अनेक विषय बोलता येईल...पण सर्वांना कल्पना आहेच...
आता असे वाटू शकते की मोदी..मोदी..मोदी काय लावले आहे...व्यक्तीप्रेमाचे स्तोम माजवले जात आहे....पण मुळातूनच या गोष्टीकडे बघताना भारतीयांच्या,या देशातील हिंदु समाजाच्या (सांस्कृतिक अर्थाने) मानसिकतेचा विचार करायला हवा...ज्या देशात 
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥
परित्राणाय साधूनां विनाशायच च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥

अर्थात जेव्हां जेव्हां धर्माला ग्लानि येऊन अधर्म बोकाळतो तेव्हां तेव्हां तो अधर्म आचरणार्या दुष्टांचा नाश करून, धर्म आचरणार्या सज्जनांचं रक्षण करून अधर्माचा नाश व धर्माचं पुनःप्रस्थापन करण्यासाठी परमेश्वर युगानुरूप वारंवार अवतार धारण करतात. असा अवतार धारण करून अधर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय व तो कसा आचरावा व त्याचे फलित काय, अधर्माचरणाचे फलित काय - याचं ज्ञान परमेश्वर अवतार देतात.
ही श्रद्धा आहे...विश्वास आहे...तिथे मोदीजींसारख्या मनुष्याच्या अत्युच्च गुणांचा समुच्चय असलेले नेतृत्व तावूनसुलाखून पुढे आले आहे..तर अपेक्षा वाढणारच... यात गैर काय...आज मोदीजी आहेत..उद्या योगीजी असतील...परवा अजून कोणीतरी...

आपण यातून एक सकारात्मक बोध घेवूयात की २१ वें शतक हे भारताचे असेल, हिंदुत्वाचे असेल,भारत मातेच्या परमवैभवाचे असेल...हा राष्ट्राच्या पुनरुत्थानाचा महायज्ञ चालू आहे...या यज्ञात स्वतःच्या जीवन समिधा अर्पण करण्यासाठी श्रीराम कृष्ण होवून गेले...आता मोदीजी... योगी जी...ही परंपरा अशीच चालू राहील ....जगाला विश्वबंधुत्व शिकविण्यासाठी.....भारताच्या महानतेचे दर्शन घडविण्यासाठी....



रविंद्र बाळासाहेब माने

Comments

Post a Comment

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

कर्नाटक पराभव -भाजपच्या अपरिहार्य तेचा परिणाम

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"