Posts

Showing posts from April, 2018

नरेंद्रभाई मोदी आणि यशोदाबेन

"नरेंद्रभाई मोदी आणि यशोदाबेन" राष्ट्रनेते नरेन्द्रभाई यांच्या वैवाहि क जीवनाबद्दल कॉंग्रेस कडून आरोप करण्यात येत आहेत व त्यातून खूप मोठा तीर मारल्याचे खोटे समाधान मानून घेत आहे.वास्तविक नरेंद्र भाईंचा त्याकाळच्या प्रथेप्रमाणेच बालवयात विवाह करण्यात आला होता.आणि त्या प्रथेनुसार मुलगी जाणती होईपर्यंत माहेरीच राहत असे.दरम्यानच्या कालखंडात वडिलांना चहा व्यवसायात मदत करत शिक्षण घेत असलेल्या नरेंद्र भाई नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रभावित होवून आपले उर्वरित आयुष्य पूर्णवेळ संघाचे प्रचारक बनून भारतमातेची सेवा करण्याचा संकल्प केला होता. हि गोष्ट आपले कुटुंबीय व पत्नीला भेटून त्यांनी सांगितले.आणि पत्नीला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची परवानगी सुद्धा दिली.त्यावेळेसच त्यांच्या या देशभक्त विचारांनी प्रभावित झालेल्या यशोदाबेन यांनी सुद्धा दुसरा विवाह न करण्याचा निर्णय घेतला.व आजतागायत एका शिक्षिकेची नोकरी करत आपले जीवन समाधानाने जगत आहेत. नरेन्द्रभाई सुद्धा आधी संघप्रचारक व नंतर संघटन मंत्री म्हणून भाजपची बांधणी केल्यानंतर पक्षाने त्यांचे कर्तुत्व बघून त्यांना गुजरा

मनोगत-एका कार्यकर्त्याचे!

Image
*!!जय श्रीराम!!* *मनोगत- एका कार्यकर्त्याचे!* *पूर्वी राजकारण हे जनसेवेचे एक माध्यम आहे असे मानणाऱ्या आणि ध्येयवादाने झपाटलेल्या,चरित्र्यसम्पन्न नेत्यांमुळे राजकारण हे समाज जीवनात एक आदराचे स्थान टिकवून होते.व त्यामुळे कार्यकर्ता हा सुद्धा अतिशय समर्पित वृत्तीने कार्यरत असायचा.पण हळू हळू कालांतराने राजकारण हे केवळ आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन बनू लागले.ध्येयनिष्ठे पेक्षा व्यक्तीनिष्ठा महत्वाची ठरू लागली.* *अशा वैचारिक अधोगतीमुळे कार्यकर्ता हा सुद्धा मोबदल्याचा विचार करू लागला.मला काय मिळणार हि वृत्ती बळावू लागली.आणि राजकारणाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन बदलू लागली.त्याची परिणीती सर्वच राजकीय पक्ष वाईट असे घातक मत सर्वसामान्य जनतेचे बनण्यात झाली..आणि काही पक्ष हि भावना प्रबळ करण्याचे आणि अराजक पसरविण्याचे काम करताना दिसत आहे.* *पण राष्ट्रनेते नरेन्द्रभाई मोदी यांच्या सारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीने पुन्हा एकदा जनतेच्या मनात राजकारणाबद्दल आपले मत बदलविण्यास भाग पाडले आहे.* *तब्बल तीन दशकांनतर कुठल्याही एका पक्षाला बहुमत जनतेने दिले.हा मोदींच्या आश्वासक नेतृत्वावरचा जन