नरेंद्रभाई मोदी आणि यशोदाबेन
"नरेंद्रभाई मोदी आणि यशोदाबेन"
राष्ट्रनेते नरेन्द्रभाई यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल कॉंग्रेस कडून आरोप करण्यात येत आहेत व त्यातून खूप मोठा तीर मारल्याचे खोटे समाधान मानून घेत आहे.वास्तविक नरेंद्र भाईंचा त्याकाळच्या प्रथेप्रमाणेच बालवयात विवाह करण्यात आला होता.आणि त्या प्रथेनुसार मुलगी जाणती होईपर्यंत माहेरीच राहत असे.दरम्यानच्या कालखंडात वडिलांना चहा व्यवसायात मदत करत शिक्षण घेत असलेल्या नरेंद्र भाई नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रभावित होवून आपले उर्वरित आयुष्य पूर्णवेळ संघाचे प्रचारक बनून भारतमातेची सेवा करण्याचा संकल्प केला होता. हि गोष्ट आपले कुटुंबीय व पत्नीला भेटून त्यांनी सांगितले.आणि पत्नीला स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याची परवानगी सुद्धा दिली.त्यावेळेसच त्यांच्या या देशभक्त विचारांनी प्रभावित झालेल्या यशोदाबेन यांनी सुद्धा दुसरा विवाह न करण्याचा निर्णय घेतला.व आजतागायत एका शिक्षिकेची नोकरी करत आपले जीवन समाधानाने जगत आहेत.
नरेन्द्रभाई सुद्धा आधी संघप्रचारक व नंतर संघटन मंत्री म्हणून भाजपची बांधणी केल्यानंतर पक्षाने त्यांचे कर्तुत्व बघून त्यांना गुजरातचे मुख्यमंत्री केले.आणि कुठलाही प्रशासकीय अनुभव नसताना सचोटी,चारित्र्य ,प्रखर राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून त्यांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले.एक सामान्य चहाविक्रेता ते पंतप्रधान पदाचे उमेदवार हि वाटचाल त्यांचे असामान्य कर्तुत्व समजण्यासाठी पुरेसे आहे.
असो,आत्तापर्यंतच्या निवडणुकात उमेदवारी अर्ज भरताना पत्नीसंदर्भातील रकाना भरणे अनिवार्य नव्हते म्हणून तो रिकामाच ठेवला जात होता.पण निवडणूक आयोगाच्या नव्या नियमामुळे सर्व रकाने भरणे आवश्यक केल्यामुळे कायदेशीर अडचण निर्माण होवू नये म्हणून त्यांनी पत्नी विषयी माहिती भरली.
मातृभूमीसाठी भौतिक सुखांचा त्याग करणारा एक स्वयंसेवक आणि पतीच्या सुखातच आपले सुख मानून आपले सर्वस्व अर्पण करणारी आदर्श भारतीय स्त्री यांच्यातील ते पवित्र नाते एडविना माउंटबैटन शी अनैतिक संबंध ठेवून देशहिताचा सौदा करणाऱ्या नेहरू चा वारसा सांगणाऱ्या आणि एका इंग्रजाची पैदाईश असणार्या काँग्रेसला काय समजणार!
जय श्रीराम!
Comments
Post a Comment