"बिभिषणांची आवश्यकता"

*!!जय श्रीराम!!*


*बिभिषणांची आवश्यकता*


*गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर नेत्यांचा प्रवेश होत आहे.निवडणुकांच्या तोंडावर असे पक्षप्रवेशाचे सोहळे महाराष्ट्राला नविन नाहीत.पण  सोशल मिडिया च्या या काळामध्ये या गोष्टी खूपच मनोरंजक पद्धतीने प्रसिद्धी मिळवत आहेत.*


*या सर्व घडामोडींचा मतदारांवर होणारा परिणाम हा तितकासा महत्वाचा वाटत नाही.कारण सर्वसामान्य मतदार हा फारच व्यावहारिकपणे या सगळ्या गोष्टींकडे पहाताना दिसतो...*


*मग या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ-जनसंघ-भाजपाच्या कार्यकर्त्यांची मनोभूमिका समजून घेणे अगत्याचे ठरते.हा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम...भारतमातेला परमवैभव प्राप्त करुन देणे...राष्ट्र बलशाली होणे या उदात्त आणि व्यापक ध्येयाने भारावलेला..राष्ट्रहित सर्वोपरी या संस्कारामध्ये वाढलेला असल्याने ....सत्तासुंदरीच्या फारशा मोहात न पडणारा असल्याने ...दलबदल कार्यक्रम पचनी पडत नाही.किंबहुना यामुळे हा कार्यकर्ता अस्वस्थ झालेला पहायला मिळतो.हे स्वाभाविकच आहे...*


*मग हे सगळे चालले आहे हे सर्व चुकीचे आहे का?*

*मला तर यात काहीच चुकीचे वाटत नाही...कारण रावणराज्य संपवून रामराज्य आणण्यासाठी अशा अनेक बिभिषणांची आवश्यकता निर्माण झाली आहे.*

*याबाबतीत माझे वैयक्तिक मत तर असे आहे...आणि ते अतिशय व्यावहारिक आहे...आपण म्हणतो की आपल्यासाठी सत्ता हे साध्य नसून साधन आहे....पण हे साधन मिळविण्यासाठी सद्यपरिस्थितीत आपल्याला १२२ पेक्षा अधिक जागा मिळविणे हे क्रमप्राप्त ठरते...अशा वेळी आपण कधीही न जिंकलेल्या व  यावेळीसुद्धा जिंकू न शकणाऱ्या जागांवरील नेत्यांनाच आणि त्यातही चांगल्या लोकप्रिय व्यक्तिमत्वानांचआपल्यात घेऊन आपले संख्याबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हे राजकिय शहाणपणाचे लक्षण ठरते..आणि हेच शहाणपण आपले नेते दाखवत आहेत...आपला आपल्या नेतृत्वावर विश्वास असायला हवा...दस्तूरखुद्द लोकमान्य टिळकच म्हणाले होते "सत्तेशिवाय शहाणपण फुकट आहे!"*            *व्यापक राष्ट्रहितासाठी आणि उज्वल भविष्यासाठी असे काही निर्णय पक्षनेतृत्वाला घ्यावेच लागतात...आणि यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचा अव्हेर,दुर्लक्ष,मानसन्मानात कुठलिही तडजोड होणार नाही हे मात्र नक्की!*

*संघटनांच्या बाबतीत संख्यात्मक वाढ हि विविध आंदोलने ...सामाजिक उलथापालथ किंवा राजकिय सत्ताबदल या नंतर होताना दिसते...तेव्हा या संख्यात्मक वाढीकडे भरतीची स्वाभाविक प्रक्रिया म्हणून बघण्याची आवश्यकता आहे.*

*मग या सगळ्या भरती प्रक्रियेकडे आपल्या संघटनसूत्राप्रमाणे "आहे तसा घ्यायचा आणि पाहिजे तसा घडवायचा" सकारात्मक दृष्टी ठेवण्याची गरज आहे.*


*या सर्व नव्याने भरती झालेल्या नेत्या कार्यकर्त्यांना आपल्या या संघटनशक्तीची आणि त्यातील व्यापक राष्ट्रहिताची महती समजावून सांगण्याची व त्या विचारसुत्राशी जुळवून घेण्यासाठी सहाय्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांचीच असणार आहे....हि जबाबदारी आपण पार पाडूया...शेवटी जो या विचारधारेशी जोडला जाणार आहे तो आपला ...आणि या सर्व संस्कारपर्वांनंतरही कोरडा राहणारा व फक्त सत्तासुंदरीच्या मागे धावणारा हा क्षणिक सुखाच्या मागेच धावू द्या...आपण मात्र पुन्हा "तेरा वैभव अमर रहे माँ..हम दिन चार रहे ना रहे म्हणत पुन्हा कार्यमग्न व्हायचे!*         


*"राष्ट्रप्रथम...नंतर पार्टी....शेवटी स्वतः"*                                      *भारत माता कि जय*                


 *रविंद्र बाळासाहेब माने*

तळेगाव दाभाडे ता.मावळ जि.पुणे ४१०५०६                            8788996058



Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी