मनोगत-एका कार्यकर्त्याचे!

*!!जय श्रीराम!!*



*मनोगत- एका कार्यकर्त्याचे!*
*पूर्वी राजकारण हे जनसेवेचे एक माध्यम आहे असे मानणाऱ्या आणि ध्येयवादाने झपाटलेल्या,चरित्र्यसम्पन्न नेत्यांमुळे राजकारण हे समाज जीवनात एक आदराचे स्थान टिकवून होते.व त्यामुळे कार्यकर्ता हा सुद्धा अतिशय समर्पित वृत्तीने कार्यरत असायचा.पण हळू हळू कालांतराने राजकारण हे केवळ आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन बनू लागले.ध्येयनिष्ठे पेक्षा व्यक्तीनिष्ठा महत्वाची ठरू लागली.*
*अशा वैचारिक अधोगतीमुळे कार्यकर्ता हा सुद्धा मोबदल्याचा विचार करू लागला.मला काय मिळणार हि वृत्ती बळावू लागली.आणि राजकारणाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन बदलू लागली.त्याची परिणीती सर्वच राजकीय पक्ष वाईट असे घातक मत सर्वसामान्य जनतेचे बनण्यात झाली..आणि काही पक्ष हि भावना प्रबळ करण्याचे आणि अराजक पसरविण्याचे काम करताना दिसत आहे.*
*पण राष्ट्रनेते नरेन्द्रभाई मोदी यांच्या सारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीने पुन्हा एकदा जनतेच्या मनात राजकारणाबद्दल आपले मत बदलविण्यास भाग पाडले आहे.*
*तब्बल तीन दशकांनतर कुठल्याही एका पक्षाला बहुमत जनतेने दिले.हा मोदींच्या आश्वासक नेतृत्वावरचा जनतेने दाखवलेला विश्वास होता.*
*मोदीजींनी सुद्धा या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही.भाजपा संसदीय बैठकिमध्ये त्यांनी हे सरकार शोषित-पिडीत-वंचित-युवा-महीला-मजदूरांना समर्पित असल्याचे सांगून देशातील शेवटच्या पंक्तीतील लोकांना आश्वस्त केले होते.*
*जन धन योजना,मुद्रा योजना,स्टैंडअप योजना,उज्वला योजना,पंतप्रधान आवास योजना,किमान वेतन वाढ,सौभाग्य योजना,अटल पेन्शन योजना,पंतप्रधान सुरक्षा विमा योजना,श्रमेव जयते, इ.अनेक योजना यशस्वीपणे राबवत गरीबांचे सरकार असल्याचा प्रत्यय दिला.*
*जगामध्ये भारताची मान उंचावण्याचे काम त्यांनी केले.*
*लुक ईस्ट-ॲक्ट ईस्ट धोरण राबवताना पूर्वेकडील राष्ट्रांशी संबंध दृढ केले.हे करत असताना पूर्वोत्तर मधील राज्यांमध्ये दळणवळणाचे जाळे निर्माण केले.चीनच्या मुजोरीला यामुळे बर्याच अंशी लगाम बसला.डोकलाम मधील भारताच्या खंबीर भूमिकेमुळे जगभरात भारताची प्रतिमा उंचावली.*
*बांग्लादेशसोबतचा सीमाप्रश्न सोडवला.*
*मध्य आशियातील अरब राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध वाढवून पाकिस्तानची कोंडी केली.जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर उघडा पाडला.*
*चीनच्या महत्वाकांक्षी OBOR प्रकल्पाला इराणमध्ये चाबहार बंदर विकसित करुन शह दिला.*
*पाकव्याप्त काश्मीरमधील व बलुचिस्तानमधील जनतेमध्ये पाकिस्तान विषयी आक्रोश व भारताविषयी जिव्हाळा निर्माण करण्यात यश मिळवले.*
*भारतीय उपखंडातील चीनच्या विस्तारवादी भूमिकेमुळे भयभित असणाऱ्या देशांमध्ये डोकलाम प्रकरणातून भारताविषयी सकारात्मक वातावरण तयार झाले*
*
*मेक इन इंडीया,स्टार्टअप इंडीया,डिजिटल इंडीया,न्यू इंडिया,सागरमाला,भारतमाला,नमामि गंगे,नदी जोड प्रकल्प,बुलेट ट्रेन,भारतीय रेल्वेच्या सर्व घोषित प्रकल्पांना पूर्ण करण्याचे नियोजन सुरु झाले.*
*शेतीमालाला दिडपट भाव देण्याचे,शेतकरी व विक्रेता यामधील आडतेदारांची नाकेबंदी करुन शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवून दिला.*
*सॉईल हेल्थ कार्ड,शेतकरी कर्ज माफी,पंतप्रधान पीक विमा योजना,ई-मार्केट,पंतप्रधान सिंचन योजना,इ.अनेक योजना शेतकरी सक्षम होण्याच्या दृष्टीने सुरु आहेत.*
*कैशलेस योजनेतून लेसकैश होण्याकडे वाटचाल....*
*बैंकांच्या विलीनकरणातून बैंकांचे सक्षमीकरण...*
*स्वच्छ भारत अभियान हे लोकांनीच उचलून धरल्यामुळे यशस्वी होताना आपण पाहतो आहोत.*
*परिपूर्ण यश मिळविले हा दावा नाही...पण प्रयत्न प्रामाणिक चालू आहेत हे विरोधकांनाही मान्य करावेच लागेल.*
*रेल्वे मध्ये बंपर भरती,विविध राज्यांमध्ये आस्थापनांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरु झाल्या आहेत.यामुळे रोजगार क्षेत्रामध्ये उत्साहाचे वातावरण झालेले लवकरच पहायला मिळेल.*
*अशा समाजजीवनातील प्रत्येक अंग प्रत्यंगाचा विचार करुन अनेकविध योजना...धोरणात्मक निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी हे अत्यंत प्रामाणिकपणे चालू आहे.*
*हे सर्व चालू असलेले काम  जनतेपर्यंत पोहचविणे,जनतेला त्हिया योजनांचे महत्त्व,त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होणारे फायदे आपण समजावून सांगितले पाहीजेत.विविध योजनांच्या लाभार्थ्यांची यादी आपण केली पाहीजे.अनेक योजनांचे मेळावे आयोजित करुन जनतेला त्याचा लाभ मिळवून दिला पाहीजे.हे स्वतः मोदी किंवा फडणवीस येऊन करणार नाहीत.कार्यकर्ता म्हणून हि  आपलीच नैतिक जबाबदारी आहे.*
*आपण जर हे करण्यात कमी पडलो तर....आपल्यासारखे कपाळकरंटे आपणच......मा.अटलजींच्या सरकारने व युती सरकारने सुद्धा चांगले शासन दिले होते.पण आपण ते जनतेपर्यंत पोहचविण्यात कमी पडलो....आणि १० वर्षे त्याचे परिणाम भोगले.आता पुन्हा ही चूक व्हायला नको....सावधान!*
*स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हिंदू स्वाभिमान हा राष्ट्रीय अजेंडा होऊ पाहतो आहे.इतके दिवस बेगडी धर्मनिरपेक्षता आणि हिंदू समाजाची उपेक्षा हा एकमेव अजेंडा असलेले पक्ष मा.नरेंद्रभाईंच्या नेतृत्वाखाली हिंदु समाजाची अस्मिता जागृत होत असलेले बघून हिंदूहिताची भाषा करायला लागले आहेत.....माझ्या दृष्टीने अच्छे दिन म्हणजे नेमके हेच......याच साठी केला होता अट्टाहास!*
*बाकी अच्छे दिनाची प्रत्येकाची कल्पना वेगळी असू शकेल....आणि त्या सर्व कल्पना सत्यात उतरविण्यासाठी आपले पंतप्रधान व मुख्यमंत्री व त्यांचे सर्व सहकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.*
*मग आपण का मागे रहायचे...आपण सुस्त राहीलो...तर पुन्हा या सत्तापिपासू वसवसलेल्या टोळ्या आपल्या आशा-आकांक्षांचा घास घ्यायला टपलेल्या आहेतच......*
*थोडा विचार करा!*
*!!जय श्रीराम!!*

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

पंजाबची दुखरी नस