सेमीफायनलचे समालोचन
*!!जय श्रीराम!!* *"सेमीफायनलचे समालोचन"* *राजस्थान* राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंवर खूप नाराजी होती.कित्येक सर्वे व एक्झीट-पोल,जनतेच्या प्रतिक्रिया यामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसत होते. पद्मावत चित्रपटावेळीचा वाद व राजपूत समाजातील युवकांमध्ये प्रसिद्ध असणारा गैंगस्टर आनंदपाल याचा एनकाऊंटर मुळे भिजपचा कोअर वोटर असलेला राजपूत समाज वसुंधरा राजेंवर नाराज होता. नंतर SC-ST ॲक्ट वरुन आधी वंचित समाज आणि नंतर त्यात यथास्थिती केल्यावर पुन्हा राजपूत समाज व ब्राम्हण समाजासह सर्व तथाकथित उच्च जातींच्या नाराजीचा फटका बसणे अपेक्षितच होते. या आणि इतर गोष्टींमुळे राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये आधी विरोधकांकडून जोरदार पणे भाजपला वोट देण्यापेक्षा नोटा दाबण्याची मोहिम जाणीवपूर्वक राबविली गेली.सोशल मिडिया मधील या कैंपेन मुळे भाजपच्या पराभवाची बिजे रोवली गेली होती.यातूनच राजस्थानमध्ये "मोदीजीसे बैर नही वसुंधरा तेरी खैर नही" हि घोषणा लक्ष्यवेधी ठरली. त्यातूनच हि नाराजी कमी करण्यासाठी भाजपाने राजपूत समाजातील खा.गजेंद्रसिंह शेखावत यांना प्रदेशाध्य...