"बिभिषणांची आवश्यकता"
*!!जय श्रीराम!!* *बिभिषणांची आवश्यकता* *गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर नेत्यांचा प्रवेश होत आहे.निवडणुकांच्या तोंडावर असे पक्षप्रवेशाचे सोहळे महाराष्ट्राला नविन नाहीत.पण सोशल मिडिया च्या या काळामध्ये या गोष्टी खूपच मनोरंजक पद्धतीने प्रसिद्धी मिळवत आहेत.* *या सर्व घडामोडींचा मतदारांवर होणारा परिणाम हा तितकासा महत्वाचा वाटत नाही.कारण सर्वसामान्य मतदार हा फारच व्यावहारिकपणे या सगळ्या गोष्टींकडे पहाताना दिसतो...* *मग या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ-जनसंघ-भाजपाच्या कार्यकर्त्यांची मनोभूमिका समजून घेणे अगत्याचे ठरते.हा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम...भारतमातेला परमवैभव प्राप्त करुन देणे...राष्ट्र बलशाली होणे या उदात्त आणि व्यापक ध्येयाने भारावलेला..राष्ट्रहित सर्वोपरी या संस्कारामध्ये वाढलेला असल्याने ....सत्तासुंदरीच्या फारशा मोहात न पडणारा असल्याने ...दलबदल कार्यक्रम पचनी पडत नाही.किंबहुना यामुळे हा कार्यकर्ता अस्वस्थ झालेला पहायला मिळतो.हे स्वाभाविकच आहे...* *मग हे सगळे चालले आहे हे सर्व चुकीचे आहे का?* *मला तर यात काहीच च...