Posts

Showing posts from May, 2020

दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी

Image
*दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी * *दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी * *२६ मे २०१४ मोदी सरकारचा मला सर्वाधिक आवडलेला निर्णय...माजी लष्करप्रमुख वी.के.सिंह यांना पूर्वोत्तर विकास मंत्री बनविले...डोकलाम आणि आज लडाख मध्ये साम्राज्यवादी चीनी सैन्याची अरेरावी व युद्धखोर भूमिका पाहता किती दूरदर्शी निर्णय होता हे लक्षात येईल...* *लहानपणापासूनच संरक्षण विषयक लेख व बातम्या वाचण्याची आवड असल्यामुळे आवर्जून हे लेख वाचत असे...साधारण १८-२० वर्षांपूर्वी असावे... तिबेटमधून भारतीय सीमेपर्यंत चीन रस्ते व रेल्वेचे जाळे उभे करत असल्याची ती बातमी होती...त्यावेळेस त्याप्रकारच्या बातम्या वाचल्यावर मन अस्वस्थ व्हायचे...आपला भारत देश कधी असे करु शकेल असे वाटत रहायचे...* *मग त्यानंतर बर्याच वर्षांनी मा.मोदीजी पंतप्रधान झाले आणि कायम बचावात्मक पवित्रा घेणारा भारत आक्रमक परराष्ट्र नीतीचा अवलंब करु लागला...हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता....आज हे सर्व सांगण्याचे कारण आज पुन्हा एकदा भारत-चीन संघर्ष उभा ठाकलाय...आणि आजच्या या पृष्ठभूमीवर मा.मोदीजींच्या एका अनुभवी लष्करप्रमुखाला जनरल वी.के.सिंह यांना...