दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी

*दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी
*
*दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी

*

*२६ मे २०१४ मोदी सरकारचा मला सर्वाधिक आवडलेला निर्णय...माजी लष्करप्रमुख वी.के.सिंह यांना पूर्वोत्तर विकास मंत्री बनविले...डोकलाम आणि आज लडाख मध्ये साम्राज्यवादी चीनी सैन्याची अरेरावी व युद्धखोर भूमिका पाहता किती दूरदर्शी निर्णय होता हे लक्षात येईल...*

*लहानपणापासूनच संरक्षण विषयक लेख व बातम्या वाचण्याची आवड असल्यामुळे आवर्जून हे लेख वाचत असे...साधारण १८-२० वर्षांपूर्वी असावे... तिबेटमधून भारतीय सीमेपर्यंत चीन रस्ते व रेल्वेचे जाळे उभे करत असल्याची ती बातमी होती...त्यावेळेस त्याप्रकारच्या बातम्या वाचल्यावर मन अस्वस्थ व्हायचे...आपला भारत देश कधी असे करु शकेल असे वाटत रहायचे...*

*मग त्यानंतर बर्याच वर्षांनी मा.मोदीजी पंतप्रधान झाले आणि कायम बचावात्मक पवित्रा घेणारा भारत आक्रमक परराष्ट्र नीतीचा अवलंब करु लागला...हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता....आज हे सर्व सांगण्याचे कारण आज पुन्हा एकदा भारत-चीन संघर्ष उभा ठाकलाय...आणि आजच्या या पृष्ठभूमीवर मा.मोदीजींच्या एका अनुभवी लष्करप्रमुखाला जनरल वी.के.सिंह यांना पूर्वोत्तर विकास मंत्री बनविण्याच्या दूरदृष्टीला दाद देत धन्यवाद मानावेसे वाटत आहे...*

*पूर्वोत्तर विकास मंत्री म्हणून संरक्षण दृष्ट्या अतिशय संवेदनशील अशा भागामध्ये रेल्वे..रस्ते...व पायाभूत सुविधांचे अक्षरशः जाळेच उभे केले आहे...या पायाभूत सुविधांच्या जोरावरच आज भारत संरक्षण दृष्टीने अतिशय मजबूत स्थितीमध्ये दिसतो आहे...*

*कोरोना संकटामुळे संपूर्ण जगाचे आर्थिक कंबरडे मोडले असताना चीन आपल्या युद्धखोर स्वभावामुळे भारत चीन सीमेवर संघर्ष उभा करु पाहतो आहे..कदाचित याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा काही कंगोरा असेल ...चीनचा काही अंतस्थ हेतू असेल पण त्याला आपले पराक्रमी भारतीय सैन्यदल तोडीस तोड प्रत्युतर देत आहेत.*

*"यथा राजा तथा प्रजा" या उक्ती प्रमाणे देशाला एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे आणि या नेतृत्वावर जनतेचा संपूर्णपणे विश्वास आहे...व जनता सुद्धा अतिशय खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभी दिसते आहे...म्हणूनच आज कोरोना संकट असो...चीन बरोबरचा संभाव्य संघर्ष असो..खंबीर नेत्यामागे जनताही खंबीर आहे...*

*भारत माँ के चरण कमल पर तन-मन-धन कर दे न्योछावर!*
*साधक आज प्रतिज्ञाकर ले जननी के इस संकट क्षण पर...जननी के इस संकट क्षण पर!!*

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

पंजाबची दुखरी नस