महापुरुषांविषयीचे वाद संपवूयात!
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी रोजच शिवजयंती! पण..... हिंदूंचा प्रत्येक सण तिथीनुसार साजरा होतो.मग आमच्या राजांची शिवजयंती हा सुद्धा आमच्यासाठी "सण"च आहे.तो फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजरा व्हावा! जर भगवान गौतम बुद्धांची बुद्ध पौर्णिमा तिथीनुसार,महान जैन पंथाचे भगवान महावीर यांच्यासह चोवीस तीर्थंकर उत्सव तिथीनुसार,महान शीख गुरुंचे प्रकाशपर्व तिथीनुसार,महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार,महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार हिंदु धर्मातील सर्व सण उत्सव तिथीनुसार साजरे केले जात असतील आणि आतातर जगभर या तिथीलाच साजरे होत आहेत.मग तारखेचा आणि तिथीचा वाद का? गेल्या काही दशकांमध्ये हिंदु संस्कृतीचे उच्चाटन व केवळ वोट बँक च्या राजकारणासाठी काही छद्म धर्मनिरपक्षतेच्या ठेकेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदु धर्माशी असलेला संबंध तोडण्याचे षडयंत्र आखले होते.त्यानुसारच हिंदु परंपरा,हिंदु संस्कृती तिरस्कार या मंडळींकडून होत होता. परंतु या देशातील हिं...