महापुरुषांविषयीचे वाद संपवूयात!

 हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!


शिवरायांच्या विचारांवर चालणाऱ्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी रोजच शिवजयंती!

पण.....

हिंदूंचा प्रत्येक सण तिथीनुसार साजरा होतो.मग आमच्या राजांची शिवजयंती हा सुद्धा आमच्यासाठी "सण"च आहे.तो फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार साजरा व्हावा! 





जर भगवान गौतम बुद्धांची बुद्ध पौर्णिमा तिथीनुसार,महान जैन पंथाचे भगवान महावीर यांच्यासह चोवीस तीर्थंकर उत्सव तिथीनुसार,महान शीख गुरुंचे प्रकाशपर्व तिथीनुसार,महात्मा बसवेश्वर जयंती तिथीनुसार,महाराणा प्रतापसिंह यांची जयंती तिथीनुसार हिंदु धर्मातील सर्व सण उत्सव तिथीनुसार साजरे केले जात असतील आणि आतातर जगभर या तिथीलाच साजरे होत आहेत.मग तारखेचा आणि तिथीचा वाद का? 


गेल्या काही दशकांमध्ये हिंदु संस्कृतीचे उच्चाटन व केवळ वोट बँक च्या राजकारणासाठी काही छद्म धर्मनिरपक्षतेच्या ठेकेदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदु धर्माशी असलेला संबंध तोडण्याचे षडयंत्र आखले होते.त्यानुसारच हिंदु परंपरा,हिंदु संस्कृती तिरस्कार या मंडळींकडून होत होता.


परंतु या देशातील हिंदु जनता आता जागृत झाली आहे.हिंदु संस्कृती आपली उन्नत विज्ञाननिष्ठ संस्कृतीला पुरोगामीत्वाच्या नावाखाली झोडपणे बंद व्हायला हवे.जातीपातीच्या अस्मित्तांना फुंकर घालून हिंदु धर्म खिळखिळा करण्याचे हे परकीय षड्यंत्र आता हाणून पाडायला हवे.



आता हिंदु समाज आपल्या संस्कृती व परंपरांचा अभिमान बाळगू लागला आहे.हिंदुत्वाचा अपमान,अव्हेर आता खपवून घेतला जाणार नाही.जे बांधव या हिंदु धर्म द्रोह्यांच्या कटकारस्थान यांना बळी पडून हिंदु संस्कृती ला विरोध करताना दिसतात त्यांनीं आता डोळे उघडुन या कडे पहावे. आणि अखिल हिंदु समाजाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रीय उत्सव होण्यासाठी तिथीनुसार जयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध व्हावे ही मनापासून प्रार्थना!

सर्व शिवभक्त एक विचाराने ही साजरी करतील यात शंका नाही!


-@रविंद्र बाळासाहेब माने

Comments

Post a Comment

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

पंजाबची दुखरी नस