कर्नाटक पराभव -भाजपच्या अपरिहार्य तेचा परिणाम
कर्नाटकच्या निमित्ताने भाजप - येदुरप्पा - अपरिहार्यता- मीमांसा अभिनंदन काँग्रेस आज बहुचर्चित अशा कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यामध्ये काँग्रेसने मोठा विजय मिळविला त्याबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक अभिनंदन! या विजयासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मल्लिकार्जुन खरगे (वय ८१ वर्ष) प्रदेशाध्यक्ष श्री. डि.के.शिवकुमार,माजी मुख्यमंत्री श्री.सिद्धरामय्या यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि विजय मिळविला. काँग्रेसच्या यशाची कारणे निवडणुक जाहीर होण्याच्या आधीपासूनच काँग्रेसने भाजपला विविध मुद्द्यांवर घेरत फ्रंटफुट वर बॅटिंग करायला सुरूवात केली होती. यामध्ये तथाकथित भ्रष्टाचार,४०% चे सरकार हे सातत्याने बोलुन बोम्म्ई सरकार विरोधात वातावरण पेटवले. भाजपचे अवलंबित्व नवीन नेतृत्वाला संधी देण्याच्या धोरणातून अनेक राज्याचे मुख्यमंत्री बदलले तसेच कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी.एस.येदुरप्पा यांना बदलून बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.पण उत्तराखंड,आसाम,त्रिपुराचे मुख्यमंत्री बदलणे आणि कर्नाटक चे मुख्यमंत्री येदुर...