Posts

Showing posts from June, 2023

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"

Image
*घराणेशाही वाचविण्याची धडपड* पाटणा येथील भाजप विरोधातील पक्षाच्या बैठकीने २०२४ च्या आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.पंतप्रधान मोदीजी यांच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्याचा मुहुर्त या बैठकीसाठी काढण्यात आला... आधी १२ जून तारीख ठरली होती पण ती पुढे ढकलली..राहुल गांधी भारतात नसल्याचे सांगण्यात आले पण खरे कारण १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद हायकोर्टाचा आलेला तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्यविरोधातील निकाल या कटु आठवणीच्या दिवशी नको म्हणून तारीख बदलण्यात आली ही खरी गोम आहे. ...नाही म्हणता भारतीय माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यात हे पक्ष यशस्वी ठरले असे म्हणता येईल. १५ पक्षांचे २७ नेते सहभागी झालेल्या या भाजप विरोधी पक्षाच्या बैठकीचे यजमानपद,पुढाकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतला होता..आणि या बैठकीत काय झाले हे सर्व आपल्यासमोर आले आहेच... एकमेकांची उणीदुणी काढून, एकमेकांवर तोंडसुख घेवून एकत्र नांदायचे यावर एकमत होवून आता पुढील बैठकीत महाठगबंधन चे संयोजक व पुढील रणनीती आखली जाणार असल्याचे सांगितले गेले...पण खरी गंमत तिथेच येणार कारण या बैठकीचे यजमान काँगेस पक्ष असण...