Posts

Showing posts from June, 2024

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

Image
अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत भूतकाळ- वर्तमानकाळ -भविष्यकाळ उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्। वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र सन्ततिः ।। - विष्णु पुराण यानि समुद्र के उत्तर और हिमालय के दक्षिण में जो देश है उसे भारत, तथा उनकी संतानों को भारती कहते हैं। भारताच्या इतिहास आणि वर्तमानाबद्दल चर्चा करताना आपण बहुतांश वेळा उत्तर भारत,पूर्व भारतातील बंगाल,मध्य भारत,पंजाब  यांचाच विचार करतो...यातून चुकून आठवलेच तर दक्षिण भारताकडे आपले लक्ष जाते.. दुर्दैवाने आपण या आपल्याच देशाचा अविभाज्य घटक असलेल्या भागाकडे दुर्लक्ष करतो... याच गोष्टींपासून बोध घेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सहकार्यवाह यांनी एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी येथे स्वामी विवेकानंद यांनी साधना केलेल्या खडकावर स्वामी विवेकानंद स्मारक उभारण्यासाठी ३०० खासदारांचा पाठिंबा मिळवला.आणि याला लोकचळवळ बनवत एक एक रुपया जमवून हे स्मारक उभे केले.या प्रयत्नांचा उल्लेख करणे महत्वाचे आहे. आपली राष्ट्रीय माध्यमे (National Media) सुद्धा फक्त हिंदी भाषिक राज्यापुरतीच मर्यादित होवून जातात. अनेकदा या ...