*!!जय श्रीराम!!* *मनोगत- एका कार्यकर्त्याचे!* *पूर्वी राजकारण हे जनसेवेचे एक माध्यम आहे असे मानणाऱ्या आणि ध्येयवादाने झपाटलेल्या,चरित्र्यसम्पन्न नेत्यांमुळे राजकारण हे समाज जीवनात एक आदराचे स्थान टिकवून होते.व त्यामुळे कार्यकर्ता हा सुद्धा अतिशय समर्पित वृत्तीने कार्यरत असायचा.पण हळू हळू कालांतराने राजकारण हे केवळ आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन बनू लागले.ध्येयनिष्ठे पेक्षा व्यक्तीनिष्ठा महत्वाची ठरू लागली.* *अशा वैचारिक अधोगतीमुळे कार्यकर्ता हा सुद्धा मोबदल्याचा विचार करू लागला.मला काय मिळणार हि वृत्ती बळावू लागली.आणि राजकारणाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन बदलू लागली.त्याची परिणीती सर्वच राजकीय पक्ष वाईट असे घातक मत सर्वसामान्य जनतेचे बनण्यात झाली..आणि काही पक्ष हि भावना प्रबळ करण्याचे आणि अराजक पसरविण्याचे काम करताना दिसत आहे.* *पण राष्ट्रनेते नरेन्द्रभाई मोदी यांच्या सारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीने पुन्हा एकदा जनतेच्या मनात राजकारणाबद्दल आपले मत बदलविण्यास भाग पाडले आहे.* *तब्बल तीन दशकांनतर कुठल्याही एका पक्षाला बहुमत जनतेने दिले.हा मोदींच्या आश्वासक नेतृत्वावरचा जन...