३७० ची पायाभरणी
"३७० ची पायाभरणी" ३ मार्च २०१५ त.दा. सुमारे २ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल कश्मीरमध्ये पीडीपीला आणी हिंदुबहुल जम्मूमध्ये भाजपला लोकमान्यता मिळाली.परंतु स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही. म्हणून गेले २ महिने तेथे राजकिय अस्थिरता निर्माण झाली होती. मागील सत्ताधीश असलेल्या नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारले होते. तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नै.कॉ.आणी काँग्रेस पीडीपीला चुचकारत होते.व एकप्रकारे जनादेशाचा अपमानच केला जात होता.म्हणजे पराभव होऊनही मागील दाराने सत्तेमध्ये सहभागी होण्याचे दोघांचे आटोकाट प्रयत्न चालले होते. अशातच किमान समान कार्यक्रमावर आधारीत सरकार स्थापण्याचे भाजप व पीडीपीने घोषीत केले आणी सत्तांध नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले. एक प्रखर राष्ट्रवादी विचारांचा पक्ष असलेल्या भाजप आणी पीडीपी एकत्र सरकार स्थापन करतात याला एक सकारात्मक घटना म्हणून बघितले पाहिजे.एका फुटिरवादी पक्षाच्या विचारांमध्ये योग्य परीवर्तन घडून येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे.खर्या अर्थाने या सरकारमुळे जम्मू काश्...