पंजाबची दुखरी नस

"पंजाबची दुखरी नस"

 -रविंद्र बाळासाहेब माने
       (तळेगाव दाभाडे)
*आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बहुचर्चित तीन कृषी कायदे रद्द केले..आणि संपूर्ण देश अवाक झाला...हीच तर मोदींची खासीयत आहे...जहाँ विरोधीयोंकी सोच खतम होती है...मोदीजी वहाँसे आगे सोचना शुरु करते है..हा फिल्मी डायलॉग आठवावा इतका रोमांचकपणे मोदीजी आपले निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करतात...*
*आज हा निर्णय झाला आणि स्वाभाविकपणे हा निर्णय युपी पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणुकांशी जोडून पाहिला जात आहे...आणि इथेच साधारण राजकारणी आणि महान नेता यातील फरक स्पष्ट होताना दिसतो...वास्तविक पाहता किसान आंदोलन हे गेल्या काही दिवसांपासुन निष्प्रभ होत आले आहे...ते धगधगते ठेवण्यासाठीच काही अराजक घटना घडविल्या गेल्या...पण विरोधकांच्या हाती फार काही लागले नाही...मग असे असताना आजच हा निर्णय का झाला?*

*मित्रांनो..पंजाब हे एक सीमावर्ती राज्य आहे..आपले शत्रुराष्ट्र पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून खा..स्तानी चळवळीला बळ देऊन पंजाबला कायम अशांत ठेवून राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आणत आहे...अॉपरेशन ब्लू स्टार,तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी हत्येनंतर झालेले शीख हत्याकांड यामुळे या जखमा कायम ओल्या ठेवण्याचे काम भारतविरोधी शक्तींकडून चालू असते.अशातच कृषी कायद्यामुळे दूर गेलेला अकाली दल,शेतकरी आंदोलनाच्या आडून पुन्हा एकदा खा..स्तानी वाद्यांची सक्रियता व त्यातून होऊ शकणारी संभाव्य हानी,पंजाबमधील राजकिय अस्थिरता,सिद्धू याचे पाकिस्तानी सत्ताधार्यांशी असलेले संबंध याविषयी माजी मुख्यमंत्री कॕ.अमरिंदरसिंग यांनी व्यक्त केलेली भीती,पवित्र कर्तारपूरसाहिब या गुरु नानकदेव यांच्या जन्मस्थळावरुन सुरु असलेले राजकारण,मुख्यमंत्री चन्नी व पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममताबानो यांनी BSF चे अधिकार क्षेत्र वाढविण्यावरुन केंद्राशी पुकारलेला संघर्ष यामुळे राष्ट्रविघातक शक्तींना पूरक वातावरण तयार होत होते.*






*या पार्श्वभूमीवर व्यापक देश हित व राष्ट्रीय ऐक्य याचा विचार करुन राजकिय हिताहित याच्या पलिकडे जाऊन जड अंतःकरणाने मा.मोदीजींनी तीन कृषी कायदे महान शीख पंथाचे संस्थापक गुरु नानकदेवजी यांच्या जयंती दिनी ही घोषणा करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.*
*पंजाब हा तसा राष्ट्रीय विचारांशी भक्कम पाठराखण करणारा प्रांत,खालसा पंथ असेल,भारतीय स्वातंत्र्यलढा असेल कायम देशाच्या रक्षणासाठी छातीचा कोट करुन उभा राहणारा आपला पंजाब...येथे पूर्वीपासून काँग्रेसचे वर्चस्व ...नंतरच्या काळात मा.प्रकाशसिंह बादल यांच्या अकाली दलाशी युती करुन पंजाब मध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न भाजप करत राहिला आणि ते स्वाभाविकच आहे.*
*पण हे करत असताना राजकिय कमी आणि राष्ट्रहिताचा अधिक विचार यामागे होता.अकाली दलाशी युतीमध्ये भाजप कायम दुय्यम भूमिकेत राहिला.विधानसभेला ११७ पैकी केवळ २३ जागा व लोकसभेला १३ पैकी केवळ ३ जागा भाजपच्या वाट्याला येत होत्या..कसाबसा भाजपा या सगळ्यात तग धरुन होता.युतीतील मोठा भाऊ असलेला अकाली दल भाजपाच्या चांगुलपणाचा फायदा घेत कायम दाबण्याचे काम करत राहिला..पण जसजसा नवज्योतसिंग सिद्धूचे भाजपामध्ये राजकिय वजन वाढत चालले तसतसे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांचे आणि त्याच्याशी अघोषित संघर्ष सुरु झाला.पंजाबमध्ये भाजपा हिंदू मतदार आणि शीख मतदार (शीख सुद्धा हिंदूच आहेत या मताचा मी आहे.) अकाली दल अशी विभागणी व या आधारावर पंजाब मधील युतीतील सत्तासमीकरण होते.*
*भाजपाकडे सक्षम शीख चेहऱ्याची कमतरता होती त्यामुळे शीख मतदारांमध्ये भाजपाचा बेस तयार होत नव्हता...आणि अशातच नवज्योतसिंग सिद्धूचे नेतृत्व उदय यामुळे अकाली दल व नवज्योतसिंग सिद्धू आणि पर्याने भाजपा यामध्ये सुप्त संघर्षाने २०१४ ची निवडणुकीपर्यंत ड्रग्समाफीयांना अकालींचे संरक्षण यामुळे सरकार विरोधात विशेषतः अकालींविरोधात वातावरण होऊ लागले होते.पण मोदीजींची अभूतपूर्व लाट असूनही केवळ भाजपा समोर नसल्यामुळे आपचे तेव्हा ४ खासदार निवडून येऊ शकले.हीच खरी अकालींसाठी धोक्याची घंटा होती.यातच अमृतसरमधून सिद्धूला उमेदवारी देण्यात येऊ नये यासाठी सुखबीरसिंग बादल हट्टाला पेटले व परिणामी अमृतसरचे तीन वेळचे खासदार  नवज्योतसिंग सिद्धू यांचे तिकीट कापले जाऊन स्व.अरुणजी जेटली यांनी कॕ.अमरिंदरसिंग यांच्या विरोधात निवडणुक लढवावी लागली व ते यात पराभूत झाले.सांगण्याचे तात्पर्य येथूनच अकाली दलाच्या दबावात राहिल्यास पंजाबमध्ये भाजपला अधिक भवितव्य नसल्याचे सिद्धू आणि भाजपामध्ये बेबनाव सुरु झाला..*
*पुढे राज्यसभेवर घेऊनही दुखावले गेलेले नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.खरेतर नवज्योतसिंग सिद्धू च्या रुपाने भाजपाला हवा असणारा लोकप्रिय शीख चेहरा भेटला होता.आणि त्याच्या आधाराने भाजपा पंजाबमध्ये आपला विस्तार करु शकणार होती.पण तेव्हासुद्धा आजच्या सारखाच राजकिय फायदा कि राष्ट्रहित यामध्ये भाजपाने राजकिय फायदा न बघता अकाली दलासोबतच राहणे पसंत केले.आजचा कृषी कायदा रद्द करण्याचा निर्णय हा असाच राजकिय लाभ यापेक्षा राष्ट्रप्रथम या विचाराने घेतला गेला आहे.आता या आंदोलनाच्या आडून सुरु असलेली अराजकता थांबावी ही भावना यामागे होती...शेतकऱ्यांचे मात्र खूप मोठे नुकसान होणार आहे..*
*मुळातच मोदीजींना या देशातील जनतेने ७० वर्षातील मळभ दूर करुन व्यवस्था परिवर्तनासाठी जनादेश दिला आहे...आणि मोदीजी तेच करत आहेत...असो..*
*लांब उडी मारायची असल्यास दोन-तीन पावले मागे जावे लागतेच...*

-

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!