३७० ची पायाभरणी

"३७० ची पायाभरणी"
३ मार्च २०१५ त.दा.
सुमारे २ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल कश्मीरमध्ये पीडीपीला आणी हिंदुबहुल जम्मूमध्ये भाजपला लोकमान्यता मिळाली.परंतु स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही.
म्हणून गेले २ महिने तेथे राजकिय अस्थिरता निर्माण झाली होती.
मागील सत्ताधीश असलेल्या नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारले होते.
तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नै.कॉ.आणी काँग्रेस पीडीपीला चुचकारत होते.व एकप्रकारे जनादेशाचा अपमानच केला जात होता.म्हणजे पराभव होऊनही मागील दाराने सत्तेमध्ये सहभागी होण्याचे दोघांचे आटोकाट प्रयत्न चालले होते.
अशातच किमान समान कार्यक्रमावर आधारीत सरकार स्थापण्याचे भाजप व पीडीपीने घोषीत केले आणी सत्तांध नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले.
एक प्रखर  राष्ट्रवादी विचारांचा पक्ष असलेल्या भाजप आणी पीडीपी एकत्र सरकार स्थापन करतात याला एक सकारात्मक घटना म्हणून बघितले पाहिजे.एका  फुटिरवादी पक्षाच्या विचारांमध्ये योग्य परीवर्तन घडून येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे.खर्या अर्थाने या सरकारमुळे जम्मू काश्मीरचा राजकिय,धार्मिक,आणी भौगोलिक  समतोल साधला गेला आहे.
३७० कलमाचे म्हणाल तर भाजपने पूर्ण बहुमत द्या ३७० कलम हटवतो असे म्हटले होते.पण नाही मिळाले.वस्तुस्थिती मान्य करत म्हणूनच आता किमान समान कार्यक्रमावर हे सरकार स्थापन होत आहे.हे सुद्धा महत्वाचे आहे.
जम्मू काश्मीर मधील सत्तेद्वारे भाजप काश्मीरमध्ये फुटीरवादी शक्तींना कमकुवत करुन राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी प्रयत्न करु शकतो.म्हणूनच या सर्व घडामोडींकडे राष्ट्रीय महत्वाच्यादृष्टीने बघितले पाहिजे.
जम्मू काश्मीर मध्ये सत्तेत सहभागी होणे एवढा संकुचित विचार भाजपचा नसून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रीय भावना प्रबळ करणे हा उदात्त हेतू आहे आणी तरीही ज्यावेळेस राष्ट्रहितासमोर संकट उभे राहिल.तेव्हा भाजप सत्तेचा त्याग करुन राष्ट्रहित जपण्यासाठी ठाम उभा राहील.याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
३७० कलमाद्वारे जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जाच तेथील फुटीरवादी मानसिकतेच्या मागील मुख्य कारण आहे.व हि मानसिकताच काश्मीर ला भारताचा अविभाज्य घटक मानायला तयार नाही.परिणामी कश्मीर कायम धुसफुसत असते.आणी हि धुसफुस कायम टिकवण्यासाठी पाकिस्तान सतत प्रयत्नशील असतो.
आता प्रश्न हा निर्माण होतो की,हे थांबणार कसे? मला वाटते यासाठी ३ मार्ग आहेत.
१)फुटिरतावादास कारणीभूत ठरणारे ३७० कलम रद्द करुन राष्ट्रीय भावना प्रबळ करण्यासाठी व्यापक आणी दिर्घकालीन राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे.
२)काश्मीरी पंडीतांचे पुनर्वसन करुन लोकसंख्येचा समतोल साधणे.
३)पाकिस्तानवर कूटनितीक दबाव वाढवणे.
या प्रकारे आपण काश्मीरला भारताशी एकरुप करण्यासाठी प्रयत्न करु शकतो.
३७० कलम हे भाजप आतासुद्धा लोकसभेतील बहुमताच्या जोरावर करु शकतो.परंतु तेथील जनमताचा आदर ठेवत भाजपने तेथे पीडीपीसोबत युती करुन सरकार स्थापन केले आहे.
म्हणून एक राष्ट्रवादी विचारांचा पक्ष प्रथमच जम्मू काश्मीर मध्ये सत्तेवर आला आहे.व त्यामुळे कुठलेही पाकिस्तानधार्जिणे धोरण तेथील सरकार घेऊ शकणार नाही.कारण भाजपचा अंकुश त्यांच्यावर असणार आहे.
आता या सर्व घडामोडींमुळे संपूर्ण हयात मानवाधिकाराच्या आणी ढोंगी धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ऊर बडवून घेणार्यांना अचानक भाजपच्या हिंदुत्वाशी केलेली तथाकथित तडजोडीचा साक्षात्कार होत आहे.व भाजपपेक्षा यांनाच ३७० कलमाची काळजी लागली आहे असे विचित्र परंतु सत्य परीस्थिती निर्माण झाली आहे.याची थोडी मजा आपणही घेऊया!
जय श्रीराम.

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी