*सांगा.....राजसाहेब...सांगा!*

*सांगा.....राजसाहेब...सांगा!*

*साधारणतः कुठल्याही राजकिय पक्षाचा वर्धापन दिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीविषयी दिशादर्शक व उद्बोधक असा असतो...आणि तो तसाच असावा यात दुमत असण्याचे कारण नाही.*
     
       *पण काल झालेल्या एका पक्षाचा वर्धापन दिन देशाच्या पंतप्रधानांच्या,मोदीजींच्या द्वेषाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात पार पडला.(कदाचित आघाडीमध्ये सामील होण्यासाठीची शेवटची धडपड असावी)*
*मोदीद्वेष असायला हरकत नाही...किंबहुना आजच्या राजकिय परिस्थितीमध्ये महाठगबंधन मध्ये सहभागी होण्याची ती पूर्वअट असावी इतका पराकोटीचा मोदीद्वेष पहायला मिळतो आहे.तो असायला हरकत नाही पण हा द्वेष करता करता आपण देशाच्या सुरक्षा यंत्रणांचे मनोबल खच्ची करतोय याच्याशी यांना काहीही देणेघेणे उरलेले नाही.एका राष्ट्रभक्त अधिकार्याला तेही कोणा ऐर्यागैर्या नाही तर देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या अजितजी डोभाल यांनाच आपल्या गलिच्छ राजकिय डावपेचामधील सोंगटी करण्याचा निंदणीय डाव खेळला जातोय...असो...*

*म्हणे...पुलवामा हल्ला भारतानेच पाकिस्तानच्या सहमतीने घडवून आणला आहे व निवडणुका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा असाच हल्ला घडविला जाऊ शकतो...असे भविष्यकथन नव्यानेच ज्योतिषी बनलेल्या पक्षप्रमुखाने केले आहे.....किव येते या किळसवाण्या मनोवृत्तीची!*

*हा तर्क जर मान्यच करायचा म्हटले तर मग १९९१ ची निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानामध्ये पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसनेच प्रचारादरम्यान स्व.राजीव गांधीना मारण्याचा कट एलटीटीई सोबत रचला होता का?कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये स्व.राजीव गांधींच्या मृत्यूनंतर सहानुभूती मुळे दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या जोरावर काँग्रेस बहुमताच्या जवळ पोहचली होती......सांगा राजसाहेब सांगा!*

*पुन्हा वरील तर्क मान्य करायचा तर मग १९९१ ला नाखुशीनेच केंद्रात संरक्षणमंत्री झालेल्या नेत्याचे बदली मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्याशी किती सख्य होते?...सांगा राजसाहेब सांगा!*

*दिल्लीमध्ये रमेना...मुंबईवाचून करमेना! असेच काहीसे झाले होते जाणत्या राजाचे!*

*मग पुन्हा मुंबईत राज्याभिषेक करवून घेण्यासाठीच घडविला गेला होता का मुंबई बॉम्बस्फोट?...सांगा राजसाहेब सांगा!*

*कोणी ठरविले होते सुधाकरराव रावांना अपयशी?कोण झाले होते बॉम्बस्फोटानंतर पुन्हा मुख्यमंत्री?..सांगा राजसाहेब सांगा!*

             *२७ एप्रिल ते १९ जून  १९९२ या कालावधीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळातील १२ मंत्र्यांच्या अॉफिसमधून दुबईला तब्बल ११३ दूरध्वनी कॉल सकाळी १ ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत वारंवार केले गेले.या सर्व कॉलची माहिती MTNL कडून मिळवून  स्व.गोपीनाथजी मुंडे साहेब यांनी तत्कालीन गृहराज्यमंत्री स्व.बापूसाहेब थिटे यांना  दिली होती.ते १२ मंत्री जाणत्या राजाचे निकटवर्तीय होते.मग आपल्याच तर्कानुसार पुन्हा जाणत्या राजाला मुख्यमंत्री बनविण्यासाठीच तर दुबईशी संगनमत करुन बॉम्बस्फोटांचे नियोजन करण्यात आले होते का?.....सांगा राजसाहेब सांगा*  
(*संदर्भ-*--https://www.indiatoday.in/magazine/indiascope/story/19950615-gopinath-munde-names-sharad-pawar-associates-for-calling-dawood-ibrahim-807430-1995-06-15)

   *ज्या व्यक्तीने (मा.अजितजी डोभाल) मुंबई बॉम्बस्फोटातील गैंगला शोधून शोधून मारले.त्याचा तर राग नाही ना तुम्हांला?.....सांगा राजसाहेब सांगा!*

*ज्या व्यक्तीने ७ वर्ष पाकिस्तानात भारताचा गुप्तहेर म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली याचा तर राग नाही ना तुम्हांला? ...सांगा राजसाहेब सांगा!*

*ज्या व्यक्तीने अतिरेकी कारवायांनी रक्तरंजीत झालेल्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये अतिरेक्यांना वेसण घालून किंवा मुत्सद्देगिरीने मुख्य प्रवाहात आणले याचा तर राग नाही ना तुम्हांला?....सांगा राजसाहेब सांगा!*

*ज्या व्यक्तीने भारतावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांवर सर्जिकल स्ट्राईक ने शत्रुला नामोहरम करुन जगामध्ये भारताची मान उंचावली याचा तर राग नाही ना तुम्हांला?.....सांगा राजसाहेब सांगा!*

*ज्या व्यक्तीने देशाच्या अखंडतेला धोका उत्पन्न करणाऱ्या खलिस्तान्यांमध्येच हेर बनून त्यांचा बिमोड करण्यात व अॉपरेशन ब्लु स्टार मध्ये मोलाची भूमिका बजावली याचा तर राग नाही ना तुम्हांला?...सांगा राजसाहेब सांगा!*

*ज्या व्यक्तीने कंदाहार विमान अपहरण कांडामध्ये मध्यस्थ बनून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवले याचा तर राग नाही ना तुम्हांला?...सांगा राजसाहेब सांगा!*

*ज्या व्यक्तीने दहशतवादी-नक्षलवादी-भ्रष्ट राजकारणी-भ्रष्ट अधिकारी-भ्रष्ट उद्योगपती-गुन्हेगार यांची पाळेमुळे नष्ट करणाऱ्या "नोटाबंदी" चा सल्ला दिला याचा तर राग नाही ना तुम्हांला?...सांगा राजसाहेब सांगा!*

*का नोटाबंदी हेच खरे दुखणे आहे....सांगा राजसाहेब सांगा!...   स्पष्टवक्तेपणा तुमचे वैशिष्ट्य आहे म्हणतात....मग बोला खरी गोम काय आहे?*

*या नोटाबंदी च्या नावाने चांगभले!"*

*सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केल्यावर काय होते हे काय सांगायला हवे!*

*या देशाला सर्वार्थाने योग्य आणि कणखर नेतृत्व मा.नरेंद्रजी मोदी यांच्यारुपाने मिळाले आहे.यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणेच देशातील नोकरशाही...देशातील जनता...यामध्ये सकारात्मक बदल पहायला मिळतो आहे.*

*वैयक्तिक स्वार्थापेक्षा "राष्ट्रप्रथम" हि भावना वाढीस लागायला हवी....तुमच्या शब्दात वजन आहे.जनता तुम्हांला लक्षपूर्वक ऐकते...त्यांचा हा विश्वास व्यर्थ जाऊ देऊ नका....*

*ऐकाल ना राजसाहेब!....*

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

पंजाबची दुखरी नस