फुर्रोगामींचा दुटप्पीपणा
१८ फेब्रुवारी २०१५ गेल्या दोन दशकांपासून राष्ट्रीय स्तरावर "धर्मनिरपेक्ष" या शब्दाभोवती राजकारण गुंफले जात आहे.तथाकथित बुद्धीवादी यावर चर्वितचर्वण करताना आपल्याला सर्वत्र आढळतात.वास्तविक पाहता धर्मनिरपेक्ष (तथाकथितच) म्हणजे काय तर एका अर्थाने सर्वधर्मसमभाव - परंतु तशी वस्तुस्थिती कुठेच आढळत नाही. "धर्मनिरपेक्ष" म्हणजे हिंदु धर्मावर यथेच्छ टिका करुन झोडपून काढणे.आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे,असा एककलमी कार्यक्रम हा तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक (मा.अडवानींच्या मते ढोंगी धर्मनिरपेक्ष) चालवत आहेत. किंबहुना त्यावरच त्यांची रोजी रोटी चालू असते. हा सर्व उहापोह येथे करण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा धर्म "पुरोगामी" हा चावून चोथा झालेला शब्द नेहमी वापरला जातो.या शब्दाची महती सांगायची म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणेच केवळ हिंदुत्वनिष्ठांना आणी हिंदुधर्माला झोडपणे यासाठीच या शब्दाचा उपयोग केला जातो.आणी जो तो मग जास्त टिका टिप्पणी करुन किंवा कल्पनाशक्तीच्या जोरावर आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतो. अंनिसं चे नरेंद्र दाभोलकर यांच्या दुर्दैवी मृत्युनं...