अनावश्यक वाद

 १५ फेब्रुवारी २०१५

मागील काही दिवसांपूर्वी शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांनी साईबाबांना देवत्व देण्याविरुद्ध आवाज उठवला व एक वाद चालू झाला.मूळात हिंदु धर्मात पूजनीय समजल्या जाणार्या शंकराचार्यांपैकी स्वरुपानंद यांनी आजपर्यंत हिंदू धर्मासाठी काय योगदान दिले.?किंबहुना त्यांच्या वक्तव्यांनी आणी कृतीने नेहमीच शंकराचार्य या पदाची आणी पर्यायाने हिंदू धर्माची विनाकारण बदनामीच झाली आहे.




साईबाबांबाबतचा वादही अनावश्यक असाच आहे.

वास्तविक हिंदु धर्म हा जगातील सर्वात सहिष्णु धर्म आहे.

"सर्वे भवन्तु सुखिनः (सर्वजण सुखी होवोत.फक्त हिंदु नाही.)

एकम् सत् विप्रः बहुधाः वदन्ति.(सत्य (परमेश्वर)एक आहे.परंतु त्याच्याकडे जाण्याचे मार्ग अनेक असू शकतात.) असे हिंदू धर्म मानतो.कुणी मूर्ती पूजा करतो कुणी निर्गुण निराकाराची आराधना करतो.कुणी मनुष्यातच ईश्वर शोधतो तर कुणी दगडाला शेंदूर फासून त्याला भजतो.अशा प्रकारे भक्ती स्वातंत्र्य इतर धर्मात?(पंथात) कुठे आहे.

एकेश्वरवाद्यांना इतरांची पूजा सहनच होत नाही.त्या पृष्ठभूमीवर हिंदुधर्मातील विचारस्वातंत्र्य अधिकच ठळकपणे उठून दिसते.त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची प्रत्येक हिंदुधर्मीयांनी काळजी घेतली पाहीजे.

सध्याचा हा वाद हिंदुधर्मातच फूट पाडण्याचा डाव वाटतोय.व स्वरुपानंद यांच्या संशयास्पद पूर्वइतिहासामुळे माझा संशय अधिकच गडद होतोय.

परंतु त्याबरोबरच हिंदुधर्मातील पराक्रम आणि सामर्थ्याचे आणि कर्मयोगाचे प्रतिक असलेल्या देवदेवतांचे महत्व कमी करुन या तथाकथित धर्मनिरपेक्ष,मुळमुळीत व्यक्तींना देवत्व बहाल करुन हिंदुधर्माला पौरुषत्वविहीन,नपुंसक बनविण्याचे षडयंत्र सुद्धा नाकारता येणार नाही.

एकदा असा विचार करुन पहा!

एक हिंदूधर्म प्रेमी.

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी