पू.सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ!

 १५ फेब्रुवारी २०१५

पू.सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ!




भरतपूर येथील "अपना घर" या सेवाभावी संस्थेच्या कार्यक्रमात पू.सरसंघचालक म्हणाले 

"मदर तेरेसा यांचे सेवाकार्य अतिशय उत्तम होते.मात्र सेवा केली जात असलेल्या लोकांना ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास सांगितले जात असे.धर्मांतराबद्दल  आमची काही हरकत नाही.परंतु सेवेच्या नावाखाली धर्मांतर होत असेल तर सेवाकार्य व्यर्थ ठरते."

म्हणजेच निस्वार्थ बुद्धीने,कुठलाही अंतस्थ हेतू न ठेवता केलेले सेवाकार्य महान असते असे त्यांना म्हणायचे होते परंतु पुन्हा एकदा धर्मनिरपेक्षतेच्या ठेकेदारांनी वस्तुस्थिती समजून न घेता त्यांच्या वक्तव्याचे प्रसारण केले व ख्रिश्चन मिशनर्यांच्या मेहरबानीवर जगणार्या वृत्तपत्रांनी व वृत्तवाहिन्यांनी तर ख्रिश्चन धर्मगुरु ,ख्रिश्चन धर्मांतरीत व्यक्ती आणी धर्मनिरपेक्षीतेचे ठेकेदार यांच्याच प्रतिक्रिया वारंवार दाखवून पू.सरसंघचालकांच्या वक्तव्यावर देशभरातून टिकेचा भडीमार होत असल्याचे तद्दन खोटे चित्र उभे केले आहे.

हिंदु संतांविषयी आरोप सिद्ध होण्याआधीच आरोपी घोषीत करुन त्यांची आणी हिंदु धर्माची प्रचंड बदनामी करणारे मदर तेरेसा वरील एका आक्षेपाने इतके उत्तेजित का झाले आहेत? 

वस्तुतः नन म्हणजे ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मप्रसाराच्या कार्यास वाहून घेतलेल्या मदर तेरेसा या भारतातच का आल्या?

जर गरीबांचीच सेवा करायची होती तर युगोस्लाव्हियामध्ये काय गरीबी संपुष्टात आली होती?

की युगोस्लाव्हियात ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम पूर्ण झाले होते. हे वास्तव आहे?

१९२९ ते १९४८ अशी जवळपास १९ वर्षे ख्रिश्चन धर्मप्रसाराचे काम अध्यापक म्हणून नोकरीवर असताना केले.मग तेथील काम पूर्ण झाल्यावर अचानक गरीब,शोषीत,पिडीत लोकांची सेवा करण्याचा साक्षात्कार झाला.हे कार्य करण्यासाठी स्वतःच्या आत्म्याची परवानगी असताना हे कार्य सुरु करण्यासाठी तत्कालीन पोपची परवानगी का मागितली.?

पोपने परवानगी दिल्यानंतर मिशनरीज अॉफ चैरीटी या संस्थेच्या माध्यमातून सेवाकार्याच्या आड धर्मांतराचे पोपचे स्वप्न पार पडू लागले. कोलकाता येथे व इंग्रजांच्या मेहेरबानीमुळे पुर्वोत्तर राज्यांमध्येही धर्मांतरण जोरदारपणे चालू होते.हिंदु केवळ नावालाच उरले होते.अशावेळेस या राज्यांमध्ये अलगतावादी म्हणजे ख्रिश्चन राष्ट्र उभारण्याचे षडयंत्र रचले गेले.या षडयंत्रात मदर तेरेसा यांच्या मिशनरीज आॉफ चैरीटी या संस्थेचा सक्रीय सहभाग होता.पुर्वोत्तर अशांत करण्यास धर्मांतरण हे मुख्य कारण होते.

मुळातच ख्रिस्ती मिशनरी हे सेवेच्या नावाखाली धर्मांतर करतात हे उघड सत्य असताना ते मान्य करण्याची इच्छा या ख्रिश्चन धार्जिण्या प्रसारमाध्यमांमध्ये नाही हेच खरे!

माजी निवडणुक आयुक्त नविन चावला लिखित मदर तेरेसा यांच्या चरीत्रात स्वतः मदर तेरेसा म्हणतात "मी समाज सेविका आहे,असा बहुतांश लोकांचा माझ्याबाबत गैरसमज आहे.पण, मी समाज सेविका नाही.मी केवळ येशू ख्रिस्ताची अनुयायी आहे आणि जगभरात ख्रिश्‍चन धर्माचा प्रसार करून जास्तीत जास्त लोकांना या धर्मात आणणे हेच माझे कर्तव्य आहे." असे असताना केवळ सेवा हि निस्वार्थबुद्धीने केली जावी या संदर्भात मदर तेरेसा यांचा उल्लेख केल्याने ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना मिरची झोंबण्याचे कारण काय?


दुसरे असे की,वैटीकन सिटी हे ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी उल्लेखनीय कार्य करणार्यांना संतपद बहाल करत असते.मग जर मदर तेरेसा यांचे धर्मांतरणाचे कार्य याविषयीचे पू.सरसंघचालकांचे वक्तव्यावर एवढा कल्लोळ करण्याचे कारणच उरत नाही.

पोपकडून संतपद प्राप्त करण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या चमत्कारांचे परीक्षण ग्राह्य धरले जाते.मदर तेरेसा यांचे सुद्धा एका महीलेच्या पोटावर हात फिरवून तिचा गर्भाशयाचा कैन्सर बरा केल्याचा चमत्कार ग्राह्य धरून मदर तेरेसा यांना संतपद बहाल करण्यात आले आहे.

देशभरातील हजारो चर्चमध्ये भोळ्याभाबड्या नागरीकांवर हिप्नोटिझमचा वापर करुन रोग बरे केल्याचे वदवून घेतले जाते व रोग बरे करण्याचा दावा केला जातो.

पुरोगामी,धर्मनिरपेक्षता यांचे ठेकेदारांना हे वास्तव दिसत नाही का?

हिंदूधर्मातील अंधश्रद्धांवर घसा कोरडा पडेपर्यंत टिका करणार्या अंनिसं वाल्यांना चर्चची अंधश्रद्धा दिसत नाही का?


धर्मनिरपेक्षतेच्या गोंडस नावाखाली केवळ हिंदुधर्मालाच टिकेचे लक्ष्य केले जात असल्याचे लक्षात आल्यानेच जनतेने यांना धडा शिकवला होता.तरीही यांनी धडा घेतला नाही.आपल्याच पायावर कुर्हाड मारुन घेणार्यांना आपण काय करणार!

जय श्रीराम

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

मोदी विरोधकांसाठी २०२४ एक "मृगजळ"

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी