फुर्रोगामींचा दुटप्पीपणा

१८ फेब्रुवारी २०१५

गेल्या दोन दशकांपासून राष्ट्रीय स्तरावर "धर्मनिरपेक्ष" या शब्दाभोवती राजकारण गुंफले जात आहे.तथाकथित बुद्धीवादी यावर चर्वितचर्वण करताना आपल्याला सर्वत्र आढळतात.वास्तविक पाहता धर्मनिरपेक्ष (तथाकथितच) म्हणजे काय तर एका अर्थाने सर्वधर्मसमभाव - परंतु तशी वस्तुस्थिती कुठेच आढळत नाही.


"धर्मनिरपेक्ष" म्हणजे हिंदु धर्मावर यथेच्छ टिका करुन झोडपून काढणे.आरोपीच्या पिंजर्यात उभे करणे,असा एककलमी कार्यक्रम हा तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक (मा.अडवानींच्या मते ढोंगी धर्मनिरपेक्ष) चालवत आहेत.

किंबहुना त्यावरच त्यांची रोजी रोटी चालू असते.

   हा सर्व उहापोह येथे करण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात सुद्धा धर्म "पुरोगामी" हा चावून चोथा झालेला शब्द नेहमी वापरला जातो.या शब्दाची महती सांगायची म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणेच केवळ हिंदुत्वनिष्ठांना आणी हिंदुधर्माला झोडपणे यासाठीच या शब्दाचा उपयोग केला जातो.आणी जो तो मग जास्त टिका टिप्पणी करुन किंवा कल्पनाशक्तीच्या जोरावर आपले पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी धडपडताना दिसतो.

अंनिसं चे नरेंद्र दाभोलकर यांच्या दुर्दैवी मृत्युनंतर आता कम्युनिष्ट विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुरोगामित्वाचे (ढोंगी पुरोगामित्व) ढोल बडवून हिंदुत्वनिष्ठांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले जात आहे.

मुळातच हिंदुधर्म हा सहिष्णू आहे.व मूळ विचाराला धक्का न लावता नविन विचारांचे स्वागत करणारा आहे.म्हणूनच विचारांचा विरोध विचारानेच करण्याचा किंबहुना दुसर्याची रेष पुसण्यापेक्षा स्वतःची रेष वाढविण्याचा कर्म सिद्धांतांचा संस्कार असलेले हिंदुत्वनिष्ठ असले नीच कृत्य करणारच नाहीत हा ठाम विश्वास आहे.

    देशभरात सर्वदूर हिंदुत्वनिष्ठ विचारांचा प्रभाव वाढत चालला आहे व कदाचित आपली रोजीरोटी बंद होण्याच्या भितीनेच पुन्हा हा ढोंगी पुरोगामित्वाचा बागुलबुवा उभा केला जात असला पाहीजे.

Comments

माझे वडील.....माझे प्रेरणास्रोत

अखंड भारत - समर्थ भारत - सशक्त भारत

"बिभिषणांची आवश्यकता"

अलौकिक नेतृत्व - नरेंद्रजी मोदी