Posts

*सांगा.....राजसाहेब...सांगा!*

*सांगा.....राजसाहेब...सांगा!* *साधारणतः कुठल्याही राजकिय पक्षाचा वर्धापन दिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीविषयी दिशादर्शक व उद्बोधक असा असतो...आणि तो तसाच...

सेमीफायनलचे समालोचन

*!!जय श्रीराम!!* *"सेमीफायनलचे समालोचन"* *राजस्थान* राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंवर खूप नाराजी होती.कित्येक सर्वे व एक्झीट-पोल,जनतेच्या प्रतिक्रिया यामध्ये त्याचे प्रतिबिंब दिसत होते. पद्मावत चित्रपटावेळीचा वाद व राजपूत समाजातील युवकांमध्ये प्रसिद्ध असणारा गैंगस्टर आनंदपाल याचा  एनकाऊंटर मुळे भिजपचा कोअर वोटर असलेला राजपूत समाज वसुंधरा राजेंवर नाराज होता. नंतर SC-ST ॲक्ट वरुन आधी वंचित समाज आणि नंतर त्यात यथास्थिती केल्यावर पुन्हा राजपूत समाज व ब्राम्हण समाजासह सर्व तथाकथित उच्च जातींच्या नाराजीचा फटका बसणे अपेक्षितच होते. या आणि इतर गोष्टींमुळे राजस्थान आणि उत्तर भारतामध्ये म्हणजे भाजपाच्या बालेकिल्ल्यामध्ये आधी विरोधकांकडून जोरदार पणे भाजपला वोट देण्यापेक्षा नोटा दाबण्याची मोहिम जाणीवपूर्वक राबविली गेली.सोशल मिडिया मधील या कैंपेन मुळे भाजपच्या पराभवाची बिजे रोवली गेली होती.यातूनच राजस्थानमध्ये   "मोदीजीसे बैर नही वसुंधरा तेरी खैर नही" हि घोषणा लक्ष्यवेधी ठरली. त्यातूनच हि नाराजी कमी करण्यासाठी भाजपाने राजपूत समाजातील खा.गजेंद्रसिंह शेखावत यांना प्रदेशाध्य...

नरेंद्रभाई मोदी आणि यशोदाबेन

"नरेंद्रभाई मोदी आणि यशोदाबेन" राष्ट्रनेते नरेन्द्रभाई यांच्या वैवाहि क जीवनाबद्दल कॉंग्रेस कडून आरोप करण्यात येत आहेत व त्यातून खूप मोठा तीर मारल्याचे खोटे समाधान म...

मनोगत-एका कार्यकर्त्याचे!

Image
*!!जय श्रीराम!!* *मनोगत- एका कार्यकर्त्याचे!* *पूर्वी राजकारण हे जनसेवेचे एक माध्यम आहे असे मानणाऱ्या आणि ध्येयवादाने झपाटलेल्या,चरित्र्यसम्पन्न नेत्यांमुळे राजकारण हे समाज जीवनात एक आदराचे स्थान टिकवून होते.व त्यामुळे कार्यकर्ता हा सुद्धा अतिशय समर्पित वृत्तीने कार्यरत असायचा.पण हळू हळू कालांतराने राजकारण हे केवळ आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचे साधन बनू लागले.ध्येयनिष्ठे पेक्षा व्यक्तीनिष्ठा महत्वाची ठरू लागली.* *अशा वैचारिक अधोगतीमुळे कार्यकर्ता हा सुद्धा मोबदल्याचा विचार करू लागला.मला काय मिळणार हि वृत्ती बळावू लागली.आणि राजकारणाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन बदलू लागली.त्याची परिणीती सर्वच राजकीय पक्ष वाईट असे घातक मत सर्वसामान्य जनतेचे बनण्यात झाली..आणि काही पक्ष हि भावना प्रबळ करण्याचे आणि अराजक पसरविण्याचे काम करताना दिसत आहे.* *पण राष्ट्रनेते नरेन्द्रभाई मोदी यांच्या सारख्या ध्येयनिष्ठ व्यक्तीने पुन्हा एकदा जनतेच्या मनात राजकारणाबद्दल आपले मत बदलविण्यास भाग पाडले आहे.* *तब्बल तीन दशकांनतर कुठल्याही एका पक्षाला बहुमत जनतेने दिले.हा मोदींच्या आश्वासक नेतृत्वावरचा जन...

माझे वडिल-माझे प्रेरणास्रोत

Image
"माझे वडिल...माझे प्रेरणास्रोत!" "रविंद्र बाळासाहेब माने" असे पूर्ण नाव लिहिल्याशिवाय मनाला समाधानच वाटत नाही.लहानपणापासूनच असे संपूर्ण नाव लिहिण्याची सवय आहे.अगदी इंटरनेटच्या जंजाळात वेगवेगळे अकाऊंट ओपन करण्यासाठी अनिवार्य नसतानाही संपूर्ण नावच टाकले आहे.कारण असे संपूर्ण नाव लिहिल्याशिवाय माझ्या नावाला पूर्णत्वच प्राप्त होत नाही.किंबहुना वडिलांच्या नावाशिवाय माझे नाव अशी कल्पनाच करवत नाही.त्यांचे नाव जोडले गेल्यामुळेच कुठे जीवनाला अर्थ प्राप्त झालाय! "वडिल" म्हणजे काय आपणा सर्वांना काय सांगावे? आज आषाढ शुद्ध दशमी (३ जुलै) माझे वडिल वैकुंठवासी बाळासाहेब तुकाराम माने यांचा द्वितीय पुण्यस्मरण दिन! बघता बघता दोन वर्षे झाली वडिल जाऊन! ज्यादिवशी वडिलांची आठवण येऊन डोळे पाणावले नाहीत...असा एकही दिवस गेला नाही.वेगवेगळे प्रसंग,कार्यक्रम किंवा सहज कुणाकडील सुखदुःखाचे प्रसंग प्रत्येक वेळी त्यांची आठवण हि निघतेच.त्यामुळे ते आम्हाला सोडून गेले आहेत असे वाटतच नाही...आत्ताच येतील..नंतर येतील असे वाटत राहते... आमचे वडिल म्हणजे माझ्यासाठी माझा आदर्शच! निर्व्यस...

सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती!

Image
सचिन तेंडूलकर......माझ्या शिक्षणाचा आयचा घो करणारा व्यक्ती! या खेळाडूने आपल्या अद्भुत फलंदाजीने जगातील प्रेक्षकांच्या मनावर प्रदीर्घ काळा अधिराज्य गाजवले.अनेकांना त्याच्या खेळातून प्रेरणा मिळाली.अनेक खेळाडू जे नंतरच्या काळात चांगले नावलौकिक मिळवते झाले त्यापैकी बरेच जण सचिनलाच आपला आदर्श मानतात.ज्याला बघत प्रेरणा घेत जे खेळाडू मोठे झाले व त्याच्यासोबतच खेळण्याचे भाग्य काहींना लाभले.अनेक मध्यमवर्गीय पालकांवर सुद्धा सचिनने मोहिनी घातली.किंबहुना मध्यमवर्गीयांच्या आशा-आकांक्षांचे सचिन तेंडूलकर हा प्रतिकच बनला होता.  एका मध्यमवर्गीय कुटुंबांतून येऊन जगाच्या व्यासपीठावर आपले नाणे खणखणीत वाजवणारा...नव्हे तर आपल्या तालावर नाचायला लावणारा... मला सुद्धा शालेय जीवनात सचिन जीवनापासूनच आवडायला लागला.खरेतर मला आणि माझ्यासारख्या असंख्य मुलांना अभ्यासावरुन लक्ष हटविण्यात सचिनचा खूप मोठा हात होता.आणि माझ्या या मताशी तर अनेक पालक सहमत असतील.क्रिकेटशी माझी नाळ विशेषतः सचिनच्या फलंदाजीशी जोडली गेली होती.मी सातवीत असताना वेस्टइंडीज १९९४ च्या भारत दौर्यावर आली असताना नागपूर कसोटीत सचिन फलंदाजी...