Posts

३७० ची पायाभरणी

Image
"३७० ची पायाभरणी" ३ मार्च २०१५ त.दा. सुमारे २ महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुस्लीमबहुल कश्मीरमध्ये पीडीपीला आणी हिंदुबहुल जम्मूमध्ये भाजपला लोकमान्यता मिळाली.परंतु स्पष्ट बहुमत कोणालाही मिळाले नाही. म्हणून गेले २ महिने तेथे राजकिय अस्थिरता निर्माण झाली होती. मागील सत्ताधीश असलेल्या नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसला जनतेने पूर्णपणे नाकारले होते. तरीही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी नै.कॉ.आणी काँग्रेस पीडीपीला चुचकारत होते.व एकप्रकारे जनादेशाचा अपमानच केला जात होता.म्हणजे पराभव होऊनही मागील दाराने सत्तेमध्ये सहभागी होण्याचे दोघांचे आटोकाट प्रयत्न चालले होते. अशातच किमान समान कार्यक्रमावर आधारीत सरकार स्थापण्याचे भाजप व पीडीपीने घोषीत केले आणी सत्तांध नैशनल कॉन्फरन्स आणी काँग्रेसचे मनसुबे उधळले गेले. एक प्रखर  राष्ट्रवादी विचारांचा पक्ष असलेल्या भाजप आणी पीडीपी एकत्र सरकार स्थापन करतात याला एक सकारात्मक घटना म्हणून बघितले पाहिजे.एका  फुटिरवादी पक्षाच्या विचारांमध्ये योग्य परीवर्तन घडून येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे.खर्या अर्थाने या सरकारमुळे जम्मू काश्...

पुणे पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने

Image
*पुणे पदवीधर च्या निमित्ताने....* ६ डिसेंबर २०२० त.दा. *गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकिय अवकाश व्यापलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका पार पडल्या.कधी नव्हे एवढी चुरस यावेळी पहायला मिळाली.नाहीतर पदवीधर निवडणुका कधी होऊन जातात हे नागरिकांना कळत सुद्धा नव्हते.बरेच नागरिक या निवडणुकीबद्दल,प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असलेले दिसले.* *अतिशय चुरशीच्या वाटणाऱ्या व भाजपाच्या बाजूने वाटणारा निकाल अनपेक्षितपणे विरोधात आला.आणि अनेकांना धक्का बसला.विशेषतः आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत मतदार बाहेर काढून मतदान करुन घेण्यासाठी प्रयत्न केले...प्रत्येक निवडणुक काही ना काही शिकवून जात असते...याही निवडणुकीमुळे विचारमंथन...आत्ममंथन...पराभवाचे विश्लेषण...नेतृत्वावर प्रश्नचिन्ह...अशी एक ना अनेक उलथापालथ होताना दिसते आहे...हे व्हायलाच हवे.* *फेसबुक..व्हाॕट्सॲप युनिव्हर्सिटी मध्ये अनेक विचारवंत जन्माला घातलेत..या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी म्हणून  या निवडणुकीच्या बाबतीत माझे स्वतःचे निरिक्षण नोंदवावेसे वाटले...* *सुरुवातीपासूनच...

पंजाबची दुखरी नस

Image
"पंजाबची दुखरी नस"  -रविंद्र बाळासाहेब माने        (तळेगाव दाभाडे) *आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बहुचर्चित तीन कृषी कायदे रद्द केले..आणि संपूर्ण देश अवाक झाला...हीच तर मोदींची खासीयत आहे...जहाँ विरोधीयोंकी सोच खतम होती है...मोदीजी वहाँसे आगे सोचना शुरु करते है..हा फिल्मी डायलॉग आठवावा इतका रोमांचकपणे मोदीजी आपले निर्णय घेऊन प्रतिस्पर्ध्यास नामोहरम करतात...* *आज हा निर्णय झाला आणि स्वाभाविकपणे हा निर्णय युपी पंजाबसह ५ राज्यांच्या निवडणुकांशी जोडून पाहिला जात आहे...आणि इथेच साधारण राजकारणी आणि महान नेता यातील फरक स्पष्ट होताना दिसतो...वास्तविक पाहता किसान आंदोलन हे गेल्या काही दिवसांपासुन निष्प्रभ होत आले आहे...ते धगधगते ठेवण्यासाठीच काही अराजक घटना घडविल्या गेल्या...पण विरोधकांच्या हाती फार काही लागले नाही...मग असे असताना आजच हा निर्णय का झाला?* *मित्रांनो..पंजाब हे एक सीमावर्ती राज्य आहे..आपले शत्रुराष्ट्र पाकिस्तान गेल्या अनेक दशकांपासून खा..स्तानी चळवळीला बळ देऊन पंजाबला कायम अशांत ठेवून राष्ट्रीय एकात्मता ध...

दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी

Image
*दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी * *दूरदर्शी नेतृत्व ...मा.नरेंद्रजी मोदी * *२६ मे २०१४ मोदी सरकारचा मला सर्वाधिक आवडलेला निर्णय...माजी लष्करप्रमुख वी.के.सिंह यांना पूर्वोत्तर विकास मंत्री बनविले...डोकलाम आणि आज लडाख मध्ये साम्राज्यवादी चीनी सैन्याची अरेरावी व युद्धखोर भूमिका पाहता किती दूरदर्शी निर्णय होता हे लक्षात येईल...* *लहानपणापासूनच संरक्षण विषयक लेख व बातम्या वाचण्याची आवड असल्यामुळे आवर्जून हे लेख वाचत असे...साधारण १८-२० वर्षांपूर्वी असावे... तिबेटमधून भारतीय सीमेपर्यंत चीन रस्ते व रेल्वेचे जाळे उभे करत असल्याची ती बातमी होती...त्यावेळेस त्याप्रकारच्या बातम्या वाचल्यावर मन अस्वस्थ व्हायचे...आपला भारत देश कधी असे करु शकेल असे वाटत रहायचे...* *मग त्यानंतर बर्याच वर्षांनी मा.मोदीजी पंतप्रधान झाले आणि कायम बचावात्मक पवित्रा घेणारा भारत आक्रमक परराष्ट्र नीतीचा अवलंब करु लागला...हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव होता....आज हे सर्व सांगण्याचे कारण आज पुन्हा एकदा भारत-चीन संघर्ष उभा ठाकलाय...आणि आजच्या या पृष्ठभूमीवर मा.मोदीजींच्या एका अनुभवी लष्करप्रमुखाला जनरल वी.के.सिंह यांना...

*देशभक्तोंका अपमान ...नही सहेगा हिंदुस्थान!*

Image
*देशभक्तोंका अपमान ...नही सहेगा हिंदुस्थान!* *देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे मग ते कोणतीही विचारधारेचा अवलंब करणारे असोत...एक देशभक्त नागरिक म्हणून माझ्या मनात त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे.* *मग ते समाजवादाचे (सोशलीझम) अनुयायी शहीद सरदार भगतसिंह असोत किंवा साम्यवादाचे (कम्युनिझम) चे समर्थक नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा काँग्रेस विचार मानणारे लोकमान्य टिळक-महात्मा गांधी किंवा प्रखर हिंदु राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर हे सर्वजण सर्व देशभक्तांसाठी एकसमान या भारतमातेचे सुपुत्र आहेत हाच भाव मनामध्ये ठाम आहे.* *या राष्ट्रभक्तांचे विचार मार्ग वेगवेगळे होते पण त्यांचे ध्येय मात्र एकच होते..भारतमातेला पारतंत्र्यातून स्वतंत्र करणे ...मग त्यांच्यामध्ये भेदभाव का?* *आपल्या क्षुद्र राजकिय स्वार्थासाठी या महान व्यक्तीमत्वांचा अपमान करणे राजकिय पक्षांनी सोडायला हवे.या महान व्यक्तीमत्वांचा त्याग वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील...हे लिहीत असताना असह्य मरणयातना भोगणार्या स्वा.सावरकरांचा चेहरा आठवून डोळ्यांत पाणी आले आहे...क्रां.बटुकेश्वर दत्त यांच्या वाट्याला आलेली ...

"बिभिषणांची आवश्यकता"

Image
*!!जय श्रीराम!!* *बिभिषणांची आवश्यकता* *गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षामध्ये इतर पक्षांमधून मोठ्या प्रमाणावर नेत्यांचा प्रवेश होत आहे.निवडणुकांच्या तोंडावर असे पक्षप्रवेशाचे सोहळे महाराष्ट्राला नविन नाहीत.पण  सोशल मिडिया च्या या काळामध्ये या गोष्टी खूपच मनोरंजक पद्धतीने प्रसिद्धी मिळवत आहेत.* *या सर्व घडामोडींचा मतदारांवर होणारा परिणाम हा तितकासा महत्वाचा वाटत नाही.कारण सर्वसामान्य मतदार हा फारच व्यावहारिकपणे या सगळ्या गोष्टींकडे पहाताना दिसतो...* *मग या सगळ्या पार्श्वभूमीवर संघ-जनसंघ-भाजपाच्या कार्यकर्त्यांची मनोभूमिका समजून घेणे अगत्याचे ठरते.हा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम...भारतमातेला परमवैभव प्राप्त करुन देणे...राष्ट्र बलशाली होणे या उदात्त आणि व्यापक ध्येयाने भारावलेला..राष्ट्रहित सर्वोपरी या संस्कारामध्ये वाढलेला असल्याने ....सत्तासुंदरीच्या फारशा मोहात न पडणारा असल्याने ...दलबदल कार्यक्रम पचनी पडत नाही.किंबहुना यामुळे हा कार्यकर्ता अस्वस्थ झालेला पहायला मिळतो.हे स्वाभाविकच आहे...* *मग हे सगळे चालले आहे हे सर्व चुकीचे आहे का?* *मला तर यात काहीच च...

*सांगा.....राजसाहेब...सांगा!*

*सांगा.....राजसाहेब...सांगा!* *साधारणतः कुठल्याही राजकिय पक्षाचा वर्धापन दिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी वाटचालीविषयी दिशादर्शक व उद्बोधक असा असतो...आणि तो तसाच...